Bigg Boss Marathi 6: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची एकच चर्चा आहे. 11 जानेवारीपासून बिग बॉसचा (Bigg Boss Marathi 6) नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे, घरात नेमकं कोण सहभागी होणार याची. सोशल मीडियावर घरातील संभाव्य स्पर्धकांच्या याद्यांनी धुमाकूळ घातलाय. आता ही उत्सुकता कलर्स मराठीने आणखी ताणली आहे ती स्पर्धकांचा प्रोमो शेअर करत.
सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीजन सहाव्या घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावरून या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.ग्लॅमरस अंदाजात समोर येणाऱ्या सुंदर तरुणीचा चेहरा मात्र अजून यात स्पष्ट दिसत नाही. पण त्यातूनही चाहते स्पर्धकाचा अंदाज बांधत आहेत. फॅशनच्या जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर भारी पडणार असं म्हणत कलर्स मराठीने कोण असेल बरं ही सुपर मॉडेल? असा प्रश्नच चाहत्यांनाच विचारला आहे.
ग्लॅमरस साडीत दारापाशी थांबलेली सुंदरी कोण?
कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवरून बिग बॉस मराठी 6 मधील पहिल्या स्पर्धकाचे झलक दाखवण्यात आली आहे. यात एक सुंदर तरुणी साडी नेसून ग्लॅमर्स अंदाजात दरवाजात उभी असल्याचे दिसतय. फॅशन जगतातील ही सुंदरी भल्या भल्यांवर पडणार भारी असं कॅप्शन या प्रमोला देण्यात आलंय. खरंतर हा एआय ने बनवलेला प्रोमो आहे तरी देखील चाहत्यांनी या प्रोमोमधील व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न केलाय. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहते वेगवेगळ्या अंदाज बांधत आहेत. काहींनी ही तरुणी युट्यूबर असल्याचं म्हटलंय. तर काही नाही अभिनेत्री उर्मिला निंबाळकर असेल असं वाटतंय. तर काहीजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली राऊतचे नाव घेत आहेत.
आता बिग बॉसच्या घरातील ही व्यक्ती कोण हे रविवारी म्हणजेच 11 जानेवारीला कळणार आहे. पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचं नवं पर्व गाजवण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख सज्ज झाला आहे. रितेश ला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत. 11 जानेवारीपासून रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचा सहावा सीजन पाहता येणार आहे.