Sonali Rauts Journey Ends in Bigg Boss: बिग बॉस मराठी सिझन 6 ला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धकांमुळे सिझनला नवी रंगत आली आहे. गेल्या आठवड्यात या घरात दुसरं एलिमिनेशन पार पडलं. पहिल्या एलिमिनेशनमध्ये प्रसिद्ध लावणी सादर करणारी राधा पाटील बिग बॉसच्या घरातून बेघर झाली. तर, गेल्या आठवड्यातील एलिमिनेशनमध्ये मॉडेल सोनाली राऊतला नारळ देण्यात आला. पहिल्या आठवड्यात सगळे स्पर्धक सेफ होते. दुसर्या आठवड्यात राधा पाटली हिला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. तर, तिसऱ्या आठवड्यात एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. दिपाली सय्यद, सोनाली राऊत, विशाल कोटियन, प्रभू शेळके, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, रूचिता जामदार, ओमकार राऊत हे स्पर्धक बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. या सदस्यांमधून सोनाली राऊतला घरातून बेघर व्हावं लागलं.
दुसऱ्या आठवड्यात सोनालीने बिग बॉसच्या घरात टास्क खेळण्यास नकार दिला होता. बिग बॉसच्या घरात टास्क खेळण्यास नकार देणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच. सोनालीच्या या वागणुकीमुळे तिला नॉमिनेट करण्यात आलं. रितेश देशमुखने देखील सोनालीच्या या वागणुकीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. या चुकीमुळे सोनालीला नॉमिनेट करण्यात आलं. टास्क न खेळणे ही चूक तिला चांगलीच महागात पडली.
एलिमिनेशनच्या दिवशी बुद्धिबळाचा टास्क पार पडतो. नंतर चुलीत घालण्याचा टास्क होतो. या टास्कमध्ये आपल्याला जे स्पर्धक आवडत नाही, त्या स्पर्धकांचे फोटो चुलीत घालायचा असतो. राकेश अनुश्रीचं फोटो चुलीत घालतो. तन्वी सोनालीचा फोटो चुलीत घालते. तर, विशालला राकेशचा गेम आवडत नसल्यामुळे तो त्याचा फोटो चुलीत घालतो. दीपालीनं दिव्याचा तर, प्रभूने सागरचा फोटो चुलीत टाकला. रोशनने सोनाली बिग बॉसच्या घरात लावालावी करते म्हणून तिचा फोटो चुलीत घालते. तर, प्राजक्ता अनुश्रीचा आणि रूचिता तन्वीचा फोटो फाडून चुलीत टाकते.
बिग बॉसच्या घरातील हे दुसरं एलिमिनेशन होतं. डेंजर झोनमध्ये एकूण सहा जण असतात. शेवटी सोनाली राऊत आणि ओमकार राऊत यांच्यापैकी ओमकार सेफ होतो. तर, सोनाली राऊत शेवटी एलिमिनेट होते. तिला बिग बॉसचं घर सोडावं लागतं.