Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात चांगलाच वादंग माजला होता. राखी सावंतने घराचा ताबा घेतल्यापासून घरात प्रचंड वादावादी, गोंधळ, भांडण होत आहे. राखी सगळ्यांना धारेवर धरत असल्याचा चित्र असतानाच एका टास्कमध्ये झालेल्या वादावादीवरून भाऊचा धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली गेली. रितेश भाऊंनी सचिन कुमावतला यावेळी चांगलाच झापले आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वात शांत सदस्य असणारा सचिन घरात फारसा दिसत नसला तरी सचिन दादा म्हणून घरामध्ये वावरतो. पण याच सचिन दादाने केलेल्या एका कृत्याने रितेश भाऊंना राग अनावर झाला होता. कलर्स मराठीने बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ सचिन कुमावतला खडसावताना दिसत आहेत.भाऊ म्हणून वावरता आणि एका महिलेसोबत असं करता का?, याबाबत रितेशने सचिनला जाब विचारला आहे. नेमकं घडलं काय पाहूया...

Continues below advertisement

सचिनचं ' ते ' कृत्य पाहून रितेश भाऊ चिडले 

बिग बॉसच्या घरात झालेल्या एका वादावादीत सचिन राखी सावंत च्या तोंडावर पाणी फेकताना दिसत आहे. त्यानंतर त्याने पीठही तिच्या अंगावर फेकल्याच दिसतं. या कृतीचा जाब रितेश भाऊंनी सचिन कुमावतला विचारलाय. रितेश भाऊ म्हणाले...

"सचिन तुम्ही राखी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठही टाकलं. हे तुमचं नॅच्युरल रिएक्शन होतं. यावर सचिन म्हणतो, ठरलेलं नव्हतं भाऊ. यावर रितेश विचारतो, "तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावर पाणी कसं फेकू शकता? तुम्ही इथं सचिन भाऊ म्हणून वावरता ना. काय तुमची रिस्पेक्ट राहणार आहे. हे मला खूप खटकलं" असा रितेश भाऊ म्हणाले. 

Continues below advertisement

 

सचिनने नेमकं काय केलं होतं?

सगळा तमाशा सुरू झाला तो राखी सावंत आणि प्राजक्ता यांच्या वादाने. राखीने प्राजक्ताला थेट झाडू मारण्याचा आदेशच दिला. पण प्राजक्ता कुठे गप्प बसणाऱ्यांपैकी होती? तिनेही सरळ सांगितलं, “मी एकटी काम करणार नाही.” इथून राखीचा पारा चढला. “आता माझं डोकंच फिरलंय,” असं म्हणत तिने किचनमधलं पीठ उचललं आणि थेट प्राजक्ताच्या तोंडावर फेकून दिलं. 

हे पाहताच घरातलं वातावरण अक्षरशः पेटलं. कुणीतरी तिला “बिनडोक” म्हणत संताप व्यक्त केला. तेवढ्यात सचिन कुमावत पुढे येत म्हणाला, “पहिल्यांदा हे साफ कर.” राखीने त्यालाच उलट “निघा!” म्हटलं.

दरम्यान सागरनेही समज देण्याचा प्रयत्न केला, “पीठ फेकायचं असेल तर घरी फेका, इथे कुणावर नाही.” पण राखीने त्यालाही “शटअप” सुनावलं. सागरही चिडला आणि वाद अजूनच भडकला. परिस्थिती इतकी तापली की विशाल आणि सचिन यांनीही राखीवर पीठ टाकून प्रत्युत्तर दिलं. 

यानंतर राखीने पाय जमिनीवर आपटत “तुम्ही सगळे माझ्या पायाखाली आहात!” म्हणाली. हे ऐकताच सचिनचा संयम सुटला. तो पुढे आला आणि थेट तिच्या तोंडावर पाणी फेकत ओरडला, “बस आता!” पाणी चेहऱ्यावर पडताच राखी अक्षरशः भडकली. तिने संतापाच्या भरात खुर्ची फेकली आणि ओरडत राहिली “माझ्यावर पाणी टाकलं? माफी माग!” पण सचिन काही थांबला नाही; तो सरळ आत निघून गेला… आणि घरातला ड्रामा शिगेला पोहोचला!