Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिवसेंदिवस गेम अधिक कठीण होत चालला आहे. 70 दिवसांनंतर आता शेवटचे 30 दिवस  राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकच स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी आपला गेम दाखवत आहे. प्रेक्षकांच्या मनात विजेता कोण होणार याची उत्सुकता वाढत चालली आहे. नुकताच बिग बॉस शोमध्ये फॅमिली विक पार पडला. प्रेक्षकांनी नुकताच प्रभू शेळकेचा( Prabhu shelke) त्याच्या कुटुंबासोबत भावनिक क्षण पाहिला होता. अजून एक दोन आठवडे प्रभू घराबाहेर जाणार नाही अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती मात्र, प्रभू शेळकेचं इव्हिक्शन होणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Bigg Boss eviction)

Continues below advertisement

प्रभू शेळके घराबाहेर ?

बिग बॉसच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून सागर कारंडे प्रभू शेळके यांचा गेम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचा दिसत आहे. सोशल मीडियावर दोघांनाही  घरातून बाहेर काढा अशी मागणी होत आहे. दरम्यान आता बिग बॉसच्या 11व्या आठवडा तर प्रभू शेळके एलिमिनेट झाल्याची चर्चा जोरात रंगलीया. दरम्यान प्रभू घराबाहेर जाण्याविषयी बिग बॉसकडून किंवा कलर्स मराठीकडून कोणतीही अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रभू शेळकेचा स्वतःचा फारसा गेम दिसलाच नाही. तो कायम तनवीच्या मागे पुढे करताना दिसला. प्रभुने प्राजक्ता शुक्रेजी पॉवर की चोरली होती त्यामुळे त्याला कॅप्टनसीची उमेदवारी मिळाली. या व्यतिरिक्त प्रभू कायम अंड्यासाठी भांडताना दिसला. सिमपथी गेमही त्याने खेळला. विशाल आणि त्याच्यात अनेकदा खटके उडाले. प्रभूचा गेम दिवसेंदिवस खालावत जात असल्याने प्रेक्षकांनीच त्याला घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement

फॅमिली वीकमधील तो भावनिक क्षण

अलीकडेच कलर्स मराठीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रभू शेळके त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पाहून प्रचंड आनंदी आणि भावनिक झाल्याचा दिसलं. त्याचे वडील त्याला भेटल्यानंतर उचलून घेता नाही प्रोमोत दाखवण्यात आलं. 

प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरात छोटा डॉन म्हणून ओळखला जातो. त्याची विनोदी आणि हटके स्टाईल कायम चर्चेत असते. तो जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्याचा आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला प्रभू याने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख तयार केली. तो थॅलेसेमिया नावाचा गंभीर आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या उपचारांसाठी वावर विकलाचही तो अनेकदा सांगताना दिसतो.