Horoscope Today 28 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 28 मार्च 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस परिस्थितीशी मिळते जुळते घ्याल, घरची आणि बाहेरची दोन्ही परिस्थितींचा समतोल साधाल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस तारेवरची कसरत करावी लागली तरी स्वास्थ्य नक्कीच मिळेल, दिवस सौख्य निर्माण करणारा ठरेल

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आनंद उत्साहाने आणि शांत वृत्तीने जीवन जगाल, घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस तुमच्या मूळच्या विनयशील आणि सुसंस्कृत स्वभावाचे दर्शन इतरांना घडेल, मित्रपरिवार वाढेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांना सर्वांचे सहकार्य उत्तम राहील, एखादी गोष्ट सलग आणि सातत्याने करणे जड जाणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस नशिबाची साथ चांगली मिळेल, ध्यानीमनी नसताना नोकरी व्यवसाय फायदेशीर घटना घडतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अनेक गोष्टींचा मोबदला द्यावा लागेल, नवीन घर घेण्याच्या शोधात असणाऱ्यांना मात्र अजून धीर धरणे आवश्यक आहे 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस विवाहाची इच्छा असणाऱ्यांचे विवाह जमतील, अविवाहित आपल्या योग्य जोडीदार निवडतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज कलाकारांनी आपली कला सादर केल्यास प्रसिद्धी मिळेल, महिला पैशाच्या बाबतीत नशीबवान ठरतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस अचानक काही संधी चालून येतील, जोडीदाराच्या धाडसाचे कौतुक वाटेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस इतरांना पूर्ण सहकार्य द्याल, नोकरी व्यवसायात अनेक कामे सहजगत्या होतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस योगायोगाचा अनुभव घ्याल, विशेष त्रास न पडता कामे पूर्ण होतील

हेही वाचा>>

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो सज्ज व्हा! एप्रिलची सुरूवातच शुभ योगांनी, 3 राशींना शुभ वार्ता, तर 3 राशींची कसोटी, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)