Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाच्या पहिल्या आठवड्यात आता घरात खेळाला वेग येताना दिसतोय. बुधवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कनंतर गुरुवारच्या भागात (15 जानेवारी ) पहिल्या कॅप्टनसाठी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कचं नाव आहे ‘बीबी फार्म- कॅप्टनपदासाठी समर्थकांची झुंज’. ही झूंज स्पर्धकांनी खरंच मनावर घेतल्याचं दिसतंय. या टास्कदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात दोन स्पर्धकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसतंय. कलर्स मराठीने आपल्या सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलाय. (Bigg Boss Captancy Task)
बिगबॉसनं गेम फिरवला, कॅप्टन्सीसाठी घरात टास्क
नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने अनपेक्षित वळण देत खेळाचं गणित बदललं. पॉवर की असतानाही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले, तर तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी पहिल्या कॅप्टनपदाच्या शर्यतीत उतरल्या. आता या तिघींपैकी कोणाच्या गळ्यात कॅप्टनची माळ पडणार, हे ठरवण्यासाठी ‘बीबी फार्म’ हा टास्क खेळवला जाणार आहे.
या टास्कची खास बाब म्हणजे कॅप्टनपदाच्या दावेदार स्वतः खेळणार नाहीत, तर घरातील इतर सदस्य त्यांच्या समर्थकांच्या भूमिकेत उतरून फार्ममधील वस्तू गोळा करताना दिसतील. ज्या स्पर्धकाला जितका जास्त पाठिंबा, तितकी तिची कॅप्टन होण्याची शक्यता वाढणार आहे.
काय आहे प्रोमोत ?
दरम्यान, या टास्कचा पहिला प्रोमो समोर आला असून त्यात वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यात तुफान राडा झाल्याचं दिसतंय. विशाल आणि ओंकार या टास्क दरम्यान एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे. त्या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची तर झालीच पण वस्तू हिसकावण्यावरून दोघांमध्ये झटापट होते आणि परिस्थिती इतकी बिघडते की ओमकार जोरात प्रतिकार करताना दिसतोय. विशाल आणि ओमकार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकाने गळा लॉक केला.झटापट झाली. पहिल्या कॅप्टनसाठीचा हा संघर्ष नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, आणि घरात पुढील समीकरणं कशी बदलणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. मात्र या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख विशाल आणि ओमकार ची कान उघडणे करणार हे निश्चित अशी चर्चा रंगली आहे.