Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्यापूर्वसंध्येलाचहिंसकवळणलागलंअसूनशहरात रक्तरंजित राडाझालाआहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
BJP vs Congress Clash : फायटर अन् दगडानेमारहाण, भूषण शिंगणे गंभीरजखमी
दरम्यान, घटनेचीमाहितीमिळताच नागपूरच्या मेयो रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नेते जमले. मारहाणकरणाऱ्याव्यक्तीवरगुन्हादाखलकरूनअटककरावी, अशीमागणीयावेळीकरण्यातआलीय. अशातचयावरबोलतानाभाजपचेशहरअध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणालेकि, गोरेवाडापरिसरातकाहीअसामाजिकतत्ववातावरणखराबकरण्याचाप्रयत्नकरतआहेत. सोबतचपैशांचादेखीलवाटपकरतआहे. याबाबतमाहितीघेण्यासाठी गेलेल्या भाजप उमेदवार भूषण शिंगणेवरहल्लाकरण्यातआला. फायटरनेत्यांच्यानाकावरमारण्यातआलं. त्यामुळेमोठ्याप्रमाणातरक्तबंबाळतेझालेत. खालीपडल्यावरदगडानेमारलं. त्यांचाहातफॅक्चरझालाअसूनइतरसहकारीहीजखमीझालेआहेत. यासंदर्भातपोलिसांकडेतक्रारदाखलकेलीआहे. मात्रसमाजकारणकरतअसतानाअशापद्धतीनेहल्लाकरणेहेनिषेधार्तआहे. इथेचनाहीतरकाँग्रेसकडूनचंद्रशेखरबावनकुळेयांचादेखीलताफाअडवण्यातआला. अशापद्धतीनेदडपशाहीकरण्याचाप्रयत्नकेलाजातअसल्याचाआरोपभाजपचेशहरअध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीकेलेआहेत.
Nagpur News : बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी अडवला
नागपूरच्या प्रभाग 10 अंतर्गत कुतुबशहानगर झोपडपट्टीमध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त गेलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. बावनकुळे वस्तीमध्ये कार्यकर्त्याच्या घरी नाही तर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी आले होते, असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि सोबतच्या कार्यकर्त्यांचा होता. निमुळत्या गल्लीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांना त्यांना तिथून बळजबरीने हटवावे लागले. या प्रकरणावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.
नागपूरच्या कुतुबशहा नगरमधील राजू देवगडे माझे फार जवळचे कार्यकर्ते आहे. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी मला बोलावले होते. कार्यकर्त्यांची भेटीगाठी त्यांच्या घरी घेत होतो. तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा वेगळ्या कारणाने आलो आहे, मात्र हा त्यांचा गैरसमज होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे ते त्या ठिकाणी आले होते. त्यांना सर्व प्रकार सत्यता समजली आहे. काँग्रेसचा झालेला गैरसमज संपला असेल असं मला वाटते. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
