BBM 6 Elimination : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 सध्या अनपेक्षित वळण घेताना दिसत आहे. या आठवड्यात घरात डबल एलिमिनेशन पार पडले असून दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.आज भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

बिग बॉसच्या घरात डबल एलिमिनेशन?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता आयुष संजीव (Ayush Sanjeev) याचा शोमधील प्रवास संपल्याचे बोलले जात आहे. आयुषची घरातील कामगिरी सातत्याने प्रभावी राहिली होती. शांत स्वभाव, योग्य रणनीती आणि टास्कमधील दमदार सहभाग यामुळे तो सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा मजबूत दावेदार मानला जात होता. त्यामुळे त्याच्या अचानक एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांत तो घरात कमी दिसत होता. जुन्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा असून, प्रकृतीमुळेच त्याचा प्रवास थांबला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र वाहिनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांच्या मनात आशा आहेत.

सोनवणे वहिनींची लव्ह स्टोरी अपूर्णच? 

दुसरीकडे, सोशल मीडियावर ‘फोकस इंडिया’ नावाने लोकप्रिय असलेला इन्फ्लुएन्सर करण सोनावणे (Karan Sonawane) हाही घराबाहेर पडल्याचे समोर आले आहे. करणचा मोकळा अंदाज, विनोदी शैली आणि घरातील सदस्यांशी असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावत होती. विशेष म्हणजे त्याची आणि प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) यांची वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली होती. त्यांच्या मैत्रीला प्रेमाची किनार लाभल्याच्या चर्चा रंगल्या होत्या; मात्र करणच्या बाहेर पडण्याने ही गोष्ट अपुरीच राहिल्याचं बोललं जातंय. या धक्कादायक डबल एलिमिनेशननंतर घरातील गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मजबूत स्पर्धक बाहेर पडू लागल्याने पुढील भागांमध्ये आणखी अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळू शकतात.यावेळचा ‘भाऊचा धक्का’ हा एपिसोडही चांगलाच गाजतोय, विशेषतः Riteish Deshmukhच्या संतापामुळे. घरात झालेल्या गैरवर्तनावरून रितेशनं Ruchita Jamdar ला कठोर शब्दांत सुनावल्याचं पाहायला मिळणार आहे. याशिवाय, Vishal Kotian यानं Dipali Sayyad संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही रितेशनं तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे घरातील वातावरण आणखी तापलेलं दिसून येत आहे.

Continues below advertisement