Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील वातावरण आता चांगलंच बदललं आहे. स्पर्धकांमधील हेवेदावे, भांडणं, वाद तर सुरूच आहेत. पण खेळकर संवाद आणि नविन तयार होत असलेल्या नात्यांकडेही प्रेक्षकांचे लक्ष आहे. बिग बॉसच्या घरात राखी सावंत आल्याने घराचा नूर पालटला आहे. पण सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे आणखी एका स्पर्धकाची. बिग बॉसच्या घरात रोज नवीन ट्विस्ट येत असतानाही प्रेक्षकांनी एक गोष्ट हेरली आहे. गेल्या दोन दिवसात आयुष संजीव बिग बॉसच्या घरातून गायब झालाय. आता या मागचं कारणही समोर आला आहे. शेवटच्या भाऊचा धक्क्यावर दिसलेला आयुष्य संजीव अचानक कुठे गेला ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याचं कारणही आता समोर आला आहे.

Continues below advertisement

आयुष का दिसत नाहीय घरात ?

आयुष शेवटचा गेल्या भाऊचा धक्क्यावर दिसला होता. नंतर हळूहळू तो कमी दिसत गेला. गेल्या दोन दिवसांचे एपिसोड पाहिले तर आयुष कुठेही दिसलेला नाही .आयुष हा बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग स्पर्धा कसल्याच बोललं जातं. लोकमत फिल्मी च्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात आयुष आजारी पडला होता .बिग बॉस ने त्याला आराम करण्याची परवानगी ही दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून तो घरात दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चिंता आहे. तो अजूनही आजारी असल्याची शक्यता आहे .त्याच्यावर डॉक्टरांचा औषधोपचार सुरू असल्याचा सांगितलं जात आहे.

 

Continues below advertisement

बिग बॉस मराठीने शेअर केलेल्या एका पोस्टरनुसार, बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीमुळे अनुश्री आणि रोशन मध्ये कॅप्टसीचा टास्क रंगणार आहे . यात आयुषचा फोटोही दिसतोय. शिवाय आयुष या आठवड्यात नॉमिनेटेडही आहे. त्यामुळे तो सेफ होतोय की घराबाहेर जातोय याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची सटकली

सध्या एका कारणामुळे बिग बॉसच्या घरात प्रचंड राडा झाला आहे.  राखीचा राग अनावर झाला आहे.  संताप होत तिनं बिग बॉसच्या घरात अक्षरश: तोडफोड केली आहे.  नुकताच बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये राखी घराची तोडफोड करताना दिसत आहे. 

बिग बॉस मराठी सिझन 6 चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हा  प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.  या प्रोमोमध्ये राखी घरात संतापलेली दिसत आहे. ती घरातील वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे.  राखी आणि सागरमध्ये टोकाचे वाद होतात.  घरातील साफसफाईवरून हा वाद  झाला असल्याचं दिसून येत आहे. दोघांमधील वादामुळे घरात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण तयार होते.