Mumbai News : भारतात अवैधरित्या (Crime News) राहतअसलेल्या बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांविरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी मोठी कारवाई केलीआहे. वर्सोवा पोलिसांकडून अंधेरी (Andheri) पश्चिम यारी रोड आणि माहीम परिसरात धाडी टाकून एकूण 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केलीआहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात दाखल होऊन कोलकाता या राज्यातून थेट मुंबई शहरात दाखल झाले होते, अशीमाहितीतपासातपुढेआलीआहे.
दरम्यान, यासंदर्भात वर्सोवा पोलिसांचा (Versova Police) एटीसी (ATC) पथकाला या बांगलादेशी नागरिकांसंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने वर्सोवा पोलिसांच्या एटीसी पथकाने अंधेरी पश्चिम यारी रोड परिसर आणि माहीम परिसरात धाडी टाकून 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
Versova Police : वर्सोवा पोलिसांची कारवाई, पुरावा देखील जप्त
वर्सोवा पोलिसांचा या कारवाईमध्ये 18 ट्रान्सजेंडर, 1 महिला, व 2 पुरुष असे 21 बांगलादेशी नागरिक अटक करण्यात आले आहेत. या आरोपीकडून वर्सोवा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा देखील जप्त केला आहेत. तर या आरोपी सोबत अजून किती बांगलादेशी नागरिक मुंबई शहरात दाखल झाले आहेत, त्यासोबत यांना मुंबई शहरात मदत कोण करत होता, या संदर्भात देखील अधिक तपास वर्सोवा पोलीस करत आहे.
Mumbai Police : मुंबईच्या मालाड पूर्वेत चार बांगलादेशी नागरिकांना पुराव्यानिशी अटक
दुसरीकडे मालाड पूर्वेत कुरार पोलिसांनी देखीलअशीचएक कारवाई केली आहे. यात मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना (Mumbai Police) यश आलं आहे. हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या (Crime News) दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते.
अशातच, मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुशंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाडी टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव तुहीनुर जायनल सरदार (वय 30 वर्षे), मोहम्मद अब्दुल मोमीन लतीफ सरदार (वय 52 वर्षे), नजरुल इस्लाम स्वर अली बिश्वास (वय 41 वर्षे), मोहम्मद इमामुल हक्क रहेमान (वय 46 वर्षे) असून हे सर्व आरोपी बांगलादेश मधले राहणारे आहेत.
इतरमहत्वाच्याबातम्या
