Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, मकर संक्रांतीचं (Makar Sankranti 2026) भारतात विशेष महत्त्व आहे. हा सण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. पंचांगानुसार, 2026 वर्षात 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या ठीक एक दिवसाआधी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 13 जानेवारी 2026 रोजी शुक्र ग्रह सकाळी 4 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह फार शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींचा चांगला काळ सुरु होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शुक्र ग्रहाचं परिवर्तन वृषभ राशीसाठी सकारात्मक संकेत देणारं ठरणार आहे. या काळात तुम्ही मेहनत घेतलेल्या कामाचं तुम्हाला फळ मिळेल. तसेच, तुमच्या वाणीत मधुरता असेल. जोडीदाराबरोबर तुम्ही अनेक नवीन प्रोजेक्टवर काम करु शकता. तसेच, तुमचं आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. चिंता करण्याची गरज नाही.
तूळ रास (Libra Horoscope)
मकर संक्रांतीला होणाऱ्या शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला चांगले शुभ संकेत मिळतील. तसेच, या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, या कालावधीत तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. तसेच, लवकरच प्रवासाचा आणि धार्मिक यात्रेचा योग जुळून येणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. मकर संक्रांतीचा काळ या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तसेच, भविष्यासाठी तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता. भौतिक सुख-समृद्धीचा चांगला लाभ घ्याल. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, या कालावधीत तुम्ही भविष्यासाठी काही योजना राबवू शकता. नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
