Bigg Boss 19 House Gas Leakage: 'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19) घरात नेहमीच मोठा गोंधळ असतो. स्पर्धक कधीकधी भांडताना आणि कधीकधी एकमेकांचे पाय ओढताना दिसतात. गेल्या आठवड्यात, 'वीकेंड का वार' मध्ये अनेक मोठे खुलासे झाले आणि घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. अशातच आता येणाऱ्या भागात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे घरात गोंधळ होऊ शकतो. खरं तर, येणाऱ्या भागात, घरात एक मोठी आणि गंभीर चूक उघडकीस येईल. ही चूक घरातल्या कोणा एका स्पर्धकाचीच असेल आणि त्याचा खुलासा घरातलाच स्पर्धक बसीर अली करणार आहे. बसीर घरातील सुरक्षेतील त्रुटींकडे सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल. एक दिवस सकाळी बसीरला घरातला गॅस रात्रभर चालूच असल्याचं आढळतं. आता यावर सलमान खान काय बोलणार? कोणती पावलं उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बसीरनं लक्षात आणून दिलेल्या या चुकीमुळे घरातील सर्व सदस्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच, शोच्या व्यवस्थेवर आणि देखरेखीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. घरातील कोणा एका सदस्याच्या निष्काळजीपणामुळे बसील व्यथित झाला आणि त्यानं लगेचच हा मुद्दा सर्वांसमोर मांडला. तसेच, या चुकीचं गांभीर्य देखील बसीरनं सर्वांच्या लक्षात आणून दिलं. यावर घरातील सदस्स्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. काही स्पर्धकांनी त्यांची चूक मान्य केली आणि त्यांच्या निष्काळजीपणासाठी माफीही मागितली. तर काहींनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. तसेच, बसीर उगाचच मुद्दा मोठा करून सांगत असल्याचं म्हटलं. या मतभेदांमुळे मोठा वाद निर्माण झाला.
'बिग बॉस'च्या घरात घमासान
वादविवादादरम्यान, अनेक आरोप-प्रत्यारोप होतील आणि गोष्टी वैयक्तिक पातळीवरही पोहोचतील. बसीर काही घरातील सदस्यांवर जबाबदारी टाळण्याचा आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याचा आरोप करतो, ज्यामुळे घरातील वातावरण आणखी बिघडतं. या घटनेतून हे दिसून येतं की, बिग बॉसच्या घरात सुरक्षितता आणि जबाबदारी केवळ मनोरंजनासाठीच नाही. बसीरचं भावनिक आवाहन आणि त्याचा राग हे दर्शविते की, अशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो, ज्यामुळे प्रत्येकाचं जीवन धोक्यात येऊ शकतं. बिग बॉसचा हा भाग केवळ प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या हादरवून सोडणार नाही तर रिअॅलिटी शोमध्येही गंभीर वास्तविक जीवनातील परिस्थिती उद्भवू शकते हे देखील दर्शवेल.
दरम्यान, 'बिग बॉस 19' बद्दल बोलायचं झालं तर, या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यामध्ये गायक-संगीतकार अमाल मलिक, टीव्ही अभिनेता गौरव खन्ना, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवेज दरबार आणि नगमा मिराजकर आणि माजी सौंदर्य स्पर्धा विजेती नेहल चुडासमा अशी नावं आहेत. शहनाज गिलचा भाऊ शाहबाजला शोमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री देण्यात आली आहे, ज्यामुळे शोमध्ये अधिक उत्साह आणि रणनीती वाढत आहे. यावेळी शोची थीम देखील वेगळी आहे, जिथे स्पर्धकांना नियंत्रणात राहण्याची शक्ती देण्यात आली आहे, ज्यामुळे शोमध्ये अनपेक्षित ट्विस्ट दिसून येणार आहेत.