Bigg Boss 19 Finale: बिग बॉस 19 चा महाअंतिम सोहळा आज रंगणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या शंभर दिवसांपासून या टीव्ही शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टॉप फायनलिस्ट्स गौरव खन्ना, तान्या मित्तल, आमाल मलिक, फरहाना भट आणि प्रणित मोरे आज 7 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांसमोर अखेरचा धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहेत. कोण ट्रॉफी जिंकणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असून गौरव आणि आमाल लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे पोल्सवरून दिसत आहे. बिग बॉसचा शेवटचा दिवस असल्याने चाहत्यांमध्ये शो संपल्याची रुखरुखही दिसतेय.

Continues below advertisement

गौरव खन्ना आणि आमाल मलिकचा बेस्टिजसोबत डान्स धमाका

फिनालेमध्ये होस्ट सलमान खान सोबत अनेक नामी सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. त्यातच टॉप फायनलिस्ट्सही स्टेजवर ग्रँड अॅक्ट सादर करणार आहेत.

Continues below advertisement

अनुपमाच्या गौरव खन्नाने त्याचा BB19 बेस्ट फ्रेंड मृद्धुल तिवारीसोबत खास डान्स केला आहे. दोघांनी बडे मियाँ छोटे मियाँ या गाण्यावर धमाल परफॉर्मन्स केल्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर चाह त्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया ही समोर येत आहेत.

दुसरीकडे, आमाल मलिक आणि त्याचा जिवलग मित्र शहबाज बदेशा पुन्हा एकत्र येत आहेत. दोघांनी हॅलो ब्रदर या सलमान व अरबाज यांच्या प्रसिद्ध गाण्यावर अॅक्ट केला आहे. शोमध्ये दोघांचा भाईचारा ऑन टॉपवर असल्याचा दिसतंय. उत्तम उदाहरण ठरलेल्या या जोडीचा परफॉर्मन्स फिनालेची शान वाढवणार आहे.

फरहाना भटचा नेहल- कुनीक्कासोबत पॉवरफुल परफॉर्मन्स

फायनलिस्ट फरहाना भटही तिच्या बेस्ट फ्रेंड नेहल चुडासामा आणि घरातील ‘किचन क्वीन’ कुनीक्का सदानंद सोबत परफॉर्म करणार आहे. जरी नेहल आणि फरहानामध्ये शेवटच्या आठवड्यांत मतभेद झाले असले तरी या परफॉर्मन्समुळे दोघींना नातं सुधारण्याची संधी मिळाल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. तिघींनी हंगामा हो गया आणि घफूर सारख्या बोल्ड ट्रॅक्सवर ग्लॅमरस ब्लॅक आउटफिटमध्ये धमाकेदार अॅक्ट केल्याचा प्रोमो चर्चेत आहे.

अभिषेक बजाज आणि अशनूर कौरचा रोमँटिक अॅक्ट

फिनालेच्या रात्री ‘अभिनूर’ फॅन्ससाठी खास सरप्राईज आहे.अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांनी कुछ कुछ होता है या सदाबहार रोमँटिक गाण्यावर सुंदर परफॉर्मन्स सादर केला आहे. या जोडीचे रिहर्सल फोटो आणि व्हिडिओ आधीच व्हायरल झाले आहेत. अशनूरने चॉकलेटी ड्रेस तर अभिषेकने त्याच रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे. याशिवाय नतालीया जानोसेक आणि नीलम गिरीही फिनालेमध्ये परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे.

Bigg Boss 19 Finale: कुठे आणि केव्हा पाहाल?

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले आज, 7 डिसेंबर 2025 रोजी प्रसारित होणार आहे.

JioHotstar Live: रात्री 9 वाजता

Colors TV Broadcast: रात्री 10:30 वाजता

गेस्ट म्हणून अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, करन कुंद्रा, सनी लियोनी, एल्विश यादव, कपिल शर्मा, ईशा मल्होत्रा आणि अभिषेक कुमार यांच्यासह मोठा सेलिब्रिटींचा ताफा उपस्थित राहणार आहे. आजच्या ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्मन्स आणि ट्रॉफीसाठीची धडपड पहायला मिळणार आहे.