Chanakya Niti : आचार्य चाणाक्य हे भारतातील अशा गुरुंपैकी एक आहेत ज्यांची शिकवण आणि त्यांची मूल्य आजही लोक आचरणात आणतात. नितीशास्त्रात चाणक्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, चाणक्यांनी स्त्री-पुरुष यांच्या गणांबाबतही नितीशास्त्रात उल्लेख केला आहे.
आज या ठिकाणी स्त्रीयांच्या याच गुणांबद्दल आचार्य चाणाक्य यांनी सांगितलं आहे. हे असे गुण आहेत ज्यामध्ये महिला नेहमी पुरुषांच्या वरचढ असतात. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'या' बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या पुढे आहेत
स्त्रीणां द्विगुण आहारो बुद्धिस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोSष्टगुण उच्यते।।
या श्लोकाच्या माध्यमातून चाणक्यांनी स्त्रियांच्या चार गुणांबद्दल सांगितलं आहे. या सर्व गुणांच्या बाबतीत महिला पुरुषांच्या नेहमीच पुढे असतात.
स्त्रीणां द्विगुण आहारो
आचार्य चाणाक्य यांच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांचा आहार पुरुषांच्या तुलनेने जास्त असतो. यामागे असं कारण आहे की, स्त्रियांची पचनसंस्थाच अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ज्यामुळे त्यांना पुरुषांपेक्षा जास्त भूक लागते.
बुद्धिस्तासां चतुर्गुणा।
बुद्धीच्या बाबतीत स्त्रिया नेहमीच पुरुषांच्या पुढे असतात असं चाणक्य म्हणतात. यामुळेच आयुष्यात येणाऱ्या संकटांचा महिला अधिक धिटाईने सामना करतात. त्याचबरोबर, स्त्रियांचा समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने कुटुंबात एकता टिकून राहते.
साहसं षड्गुणं
जरी पुरुष स्वत:ला साहसी मानत असले तरी आचार्य चाणाक्य मानतात की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया सहा पटींनी अधिक साहसी असतात. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना देखील स्त्रिया घाबरत नाहीत.
कामोSष्टगुण उच्यते।।
आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त लैंगिकता असते. त्यामुळे वर दिलेल्या श्वोकानुसार, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आठ गुणांनी अधिक लैंगिकता पाहायला मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: