Bigg Boss 19 Contestant Awez Darbar: सध्या 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) हा रिअॅलिटी शो प्रचंड गाजतोय. सलमान खान होस्ट करत असलेल्या शोनं टीआरपीच्या स्पर्धेतही मोठी झेप घेतली आहे. अशातच 'बिग बॉस 19'च्या घरातून 'वीकेंड का वार'वेळी स्पर्धक आवेज दरबार शोमधून बाहेर पडला. पण, त्यावेळी त्याची वहिनी त्याला चिअर अप करण्यासाठी शोमध्ये आलेली.  गौहरनं दिलेल्या टिप्स लक्षात घेऊन घरात आपली रणनिती आजमावण्यापूर्वीच आवेज दरबारला शोमधून बाहेर काढण्यात आलं. अनेकांनी आवेजचं एलिमिनेशन म्हणजे, त्याच्यावरचा अन्याय असल्याचं म्हटलंय. तसेच, जर आवेज बाहेरच पडणार होता, तर गौहर खानला का बोलावलं असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement


आवेजनं 2 कोटी भरुन 'बिग बॉस' सोडलं? (Did Awez Darbar Leave 'Bigg Boss' By Paying 2 Crores?)


सगळीकडे अशाही चर्चा रंगलेल्या की, गौहर खान आणि तिच्या कुटुंबानं जाणूनबुजून आवेज दरबारला शोमधून बाहेर काढलं आहे. कारण थोड्याच दिवसांत त्याची एक्स-गर्लफ्रेंड या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार होती. म्हणूनच, कुटुंबाला दोघांमधील वाद, वैयक्तिक गोष्टी नॅशनल टेलिव्हिजनवर येऊ द्यायच्या नव्हत्या, म्हणूनच त्यांनी आवेजला शोबाहेर काढलं, असं बोललं जातंय. यामुळेत कुटुंबानं 2 कोटींचा दंड भरला आणि आवेजला शोमधून बाहेर काढण्यात आलं. 


पण, नेमकं खरं काय? आणि खोटं काय? याबाबत आता स्वतः आवेज दरबारनं प्रतिक्रिया देऊन सांगितलं आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर आवेजनं पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. बिग बॉसमधून स्वेच्छेनं बाहेर पडल्यानं तो खूप नाराज असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. तसेच, त्यानं म्हटलं की, 2 कोटी रुपये देऊनह तो 50 लाखांचा शो का सोडेल? त्याला कशाची भीती आहे? जर त्याला अशी भीती असेल, तर तो नगमाला शोमध्ये का घेऊन जाईल?


आवाजनं सांगितलं त्याच्या घराबाहेर येण्याचं खरं कारण... (Awez Darbar Told  Real Reason For His Coming Out Of The House)


ईटाइम्सशी बोलताना आवाज म्हणाला की, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी किंवा माझ्या कुटुंबानं असं काहीही केलं नाही. कोणताही दंड आकारण्यात आला नाही. असं काहीही घडलं नाही की, मी शो सोडण्यासाठी 2 कोटी रुपयांचा दंड भरला. आम्ही कोणतेही पैसे दिले नाहीत. मला रिअॅलिटी शो आवडतात. मी यापूर्वी 'झलक दिखला जा'चा भाग होतो. दुखापतीमुळे मी शो सोडला. मला याचं खूप दुःख होतंय. शेवटी, मला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली, मग मी बाहेर का पडू? घरात राहणं म्हणजे 2, 4, 5 किंवा 6 कोटी रुपये कमावण्यासारखं आहे. शो मध्येच सोडल्यानं माझंच नुकसानच होईल, मग मी असं का करू?"


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathi Actress Aarti Solanki On Her Tranformation: 'माझ्या कोअ‍ॅक्टर्सनी मला छक्का म्हणून हिणवलं...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितला डोळे पाणावणारा 'तो' अनुभव