Akanksha Jindal On Abhishek Bajaj: 'बिग बॉस 19'चा (Bigg Boss) स्पर्धक अभिषेक बजाजची (Abhishek Bajaj) माजी पत्नी आकांक्षा जिंदाल (Akanksha Jindal) हिनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. अभिषेक आणि आकांक्षा यांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि 2019 मध्ये घटस्फोट झाला. दरम्यान, त्यांनी लग्न आणि घटस्फोट याबाबत कोणताही गाजावाजा केला नाही, दोघांनीही आपलं नातं गुप्त ठेवण्याता निर्णय घेतलेला. दरम्यान, अभिषेक बजाजनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर आकांक्षा आणि त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले, तेव्हा हे सत्य सर्वांसमोर उघड झालं. तेव्हाच लोकांना कळलं की, दोघांचं लग्न झालंय. 

Continues below advertisement

अभिषेक बजाजच्या लग्नाबाबत चाहत्यांना कळालंच, पण त्यासोबतच त्याच्या घटस्फोटाबाबतही लोकांना कळालं. जेवढा धक्का अभिनेत्याचं लग्न झाल्याचं कळाल्यावर चाहत्यांना बसला नव्हता, त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा धक्का चाहत्यांना अभिषेक आणि आकांक्षाच्या दीड वर्षात झालेल्या घटस्फोटाबाबत समजल्यावर बसलाय. अशातच आता आकांक्षा जिंदालनं अभिषेकसोबतच्या तिच्या नात्याबाबत आणि त्यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच, घटस्फोटाबाबतही तिचं मौन सोडलं आहे. तसेच, अभिषेक बजाजनं तिची फसवणूक केली आणि अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा दावा केला आहे. आकांक्षानं अभिषेकच्या विचित्र वागण्याबाबतही माहिती दिली. 

अनेक महिलांसोबत रंगेहाथ पकडलं अन्... 

विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत आकांक्षानं सांगितलं की, लग्नानंतर लगेचच त्यांच्यात भांडणं सुरू झाली, जेव्हा तिला अभिषेकनं तिच्याशी फसवणूक केल्याचे पुरावे सापडले. आकांक्षानं असाही आरोप केलाय की, अभिषेकचे अनेक महिलांशी संबंध होते आणि तिनं त्याला रंगेहाथ देखील पकडलेलं.

Continues below advertisement

आकांक्षानं असंही सांगितलं की, जेव्हा तिनं स्क्रीनशॉट घेतले आणि अभिषेकला दाखवलं तेव्हा त्यानं तिलाच दोष दिला. तिनं असंही स्पष्ट केलं की, अभिषेकला खूप लवकर राग यायचा, तो खूपच डॉमिनेटिंग होता.

दरम्यान, 'बिग बॉस 19'चा स्पर्धक अभिषेक बजाजवर त्याची माजी पत्नी आकांक्षा जिंदालनं गंभीर आरोप केले आहेत. अभिषेक आणि आकांक्षानं 2017 मध्ये लग्न केलं आणि 2019 मध्ये घटस्फोट घेतला. दरम्यान, अभिषेकनं त्यांचं लग्न आणि घटस्फोट याबाबत कधीच कुणाला सांगितलं नाही.