Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (BIG BOSS 17) हा शो सध्या तुफान चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये अनेक सेलिब्रिटी ठराविक दिवसांसाठी एकत्र येतात. त्यांच्यामध्ये अनेकदा वादही झालेला पाहायला मिळतो. बिग बॉसमध्ये सुरु असेलेला वाद सर्वत्र चर्चेत असतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) व्यक्तीगत आयुष्याबाबत अशाच चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसमध्ये आयेशा खानची (Ayesha Khan) एंट्री झाल्यानंतर मुनव्वरबाबतच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. आयेशा बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिने मुनव्वर फारुकीबाबत भाष्य  केले आहे. शिवाय, त्याच्यावर डबल डेटिंगचे आरोपही केलेत. आयेशाने 'बिग बॉस 17'मध्ये तिच्या आणि मुनव्वर फारुकीच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. आयेशा आणि फारुकीच्या नात्याबाबत ईशाने अभिषेक कुमार आणि विक्की जैन यांना सांगितले आहे. 


"आयेशा आणि मुनव्वर फारुकी फिजिकल रिलेशनशिपमध्ये होते. याबाबत मला आयेशाने मला माहिती दिली होती", असा दावा ईशाने केला आहे. यावर भाष्य करताना अभिषेक म्हणाला की, "आयेशाने आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टी टीव्हीवर शेअर करू नयेत. यानंतर शोमध्ये अभिषेक मुन्नवरकडे जातो आणि त्याला याबाबतची कल्पना दिली. मुन्नवर फारुकी आयेशासोबतचे नाते स्वीकारायला तयार नाही.  मुन्नवर फारूकी जेव्हा बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये दाखल झाला होता. तेव्हा तो म्हणाला होता की, "मी नजिला सोबत रिलेशनशिपमध्ये आहे." दरम्यान, आता मुन्नवरने हे देखील नाकारले आहे. मुन्नवर आयेशाला म्हणाला, "२ महिन्यांपासून मी येथे आहे. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा. नाजिला आणि माझ्यामध्ये प्रेमाचे नाते नाही. मी इथून जाण्यापूर्वी आमच्यामध्ये कोणतेही नाते नसावे, अशीच माझी इच्छा आहे." 


मुन्नवर बाबत अभिषेक काय म्हणाला?


मुन्नवर फारुकीबाबत अभिषेक म्हणाला, मुन्नवरने तो त्याच्या मुलासोबत असल्याचा खोटा दावा केला आहे. मुन्नवर सहा महिन्यांपासून त्याच्या मुलासोबत होता. पण, दोन महिन्यांपासून त्याचा मुलगा त्याच्यासोबत नाहीये. त्यांनी शोमध्ये येण्याच्या एका आठवड्यापूर्वी आपल्याकडे बोलावून घेतले होते.  बिग बॉस 9' चा विजेता प्रिंस नरुला मुन्नवर फारूकीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. प्रिंसने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "बिग बॉसचा सध्याचा शो चांगल्याप्रकारे सुरु नाही. तुम्ही कंटेटसाठी कोणाच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत बोलत असाल तर ते चुकीच आहे.