प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन भुवन बाम याचे आई-वडिलांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. भुवन बाम याने स्वत: पालकांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत याची माहिती दिली. 

Continues below advertisement


फोटो शेअर करताना भुवनने लिहिले की, “माझ्या दोन्ही लाइफलाईन कोविडमध्ये गमावल्या. आई आणि बाबाशिवाय आता काहीच पहिल्यासारखं होणार नाही.. एका महिन्यात सगळं अस्ताव्यस्त झालं. घर, स्वप्न सगळं काही. माझी आई माझ्याजवळ नाही, बाबा माझ्या सोबत नाही. आता सुरुवातीपासून जगायला शिकावं लागेल. मन मान्य करत नाही..






तो पुढे म्हणाला, “मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले? मला या प्रश्नांसह आता जगले पाहिजे. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी आशा करतो की तो दिवस लवकरच येईल. ” भुवन बाम त्याच्या लोकप्रिय बीबी की वाईन्स व्हिडिओंसाठी अधिक ओळखला जातो. यात तो दोनचार प्रकारचे कॉमेडी व्यक्तीरेखा साकारतो. भुवन गायक देखील आहे.