Bhumi Pednekar Visits Kamakhya Devi Temple : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटियाने आसाममध्ये जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या बहिनीसमवेत कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले आहेत. भूमी पेडणेकर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने मंदिराजवळील परिसरात काही फोटोशूट केले आहे. यावेळी बहिन समिक्षाही तिच्यासोबत दिसत आहे. दोन्ही बहिनी देवीच्या दर्शनानंतर कपाळावर टिळक लावत फोटोशूट करताना दिसत आहेत. 


भूमी पेडणेकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भूमी आणि तिची बहिण समिक्षासह कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शन घेतना दिसत आहे. भूमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघींच्याही माथ्यावर टिळक लावलेलं दिसत आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी भूमी पेडणेकर पारंपारिक लूकमध्ये आलेली पाहायला मिळाली. 


दोन्ही बहिणींचा एकसारखाच पेहराव 


कामाख्या देवीचे दर्शन घेताना भूमी पेडणेकर आणि तिची बहिणी एकसारख्याच पारंपारिक लूकमध्ये स्पॉट झाली. यावेळी दोघींनी देवीची पूजा करत आशीर्वाद घेतले. भूमीचे हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केलाय. 


बॉक्स ऑफिसवर भूमीचे सिनेमे ठरत आहेत फ्लॉप 


भूमी पेडणेकरने 2015 मध्ये 'दम लगा के हैशा' या सिनेमापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. भूमीच्या या सिनेमातील तिच्या अभिनयाच्या कौतुक देखील झाले. त्यानंतर 'पती पत्नी और वो' आणि 'बाला' हे भूमीचे सिनेमे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, भूमीच्या सिनेमांना कमाई करण्यात यश आले नाही. बधाई, रक्षाबंधन आणि द लेडी किलर हे सिनेमेही पडताना दिसले. 


नव्या सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार भूमी 


भूमी पेडणेकर सध्या भक्षक या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. सत्य घटनेवर आधारित क्राईम आणि ड्रामा असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुलकति यांनी केले आहे. या सिनेमातून भूमीशिवाय आदित्य श्रीवास्तव आणि संजय मिश्राही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळणार आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Thalapathy Vijay : साऊथ स्टार थलापती विजय आता राजकारणात करणार एंट्री; लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय