Bhetali Tu Punha Sequel: तरुणाईच्या पसंतीस उतरलेला 'भेटली तू पुन्हा' सिनेमा 28 जुलै 2017 रोजी प्रदर्शित झालेला. आज सिनेमाला 9 वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचं औचित्य साधून निर्मात्यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. 'भेटली तू पुन्हा 2' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या सिनेमाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येणार आहे.
स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'भेटली तू पुन्हा' या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे.
'भेटली तू पुन्हा' सिनेमाचा सीक्वल येतोय, ही माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलमुळे कथानक काय वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
