Bhagyashree Nhalve mother death after marriage: 2025 साली अनेक जण लग्नाच्या बेडीत अडकले होते. काही सेलिब्रिटींच्या घरातही सनईचे सूर घुमले. डिसेंबर महिन्यात अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिचा विवाह झाला होता. 2 डिसेंबर 2025 रोजी ती लग्नाच्या बेडीत अडकली होती. आईच्या पसंतीच्या मुलाशी तिनं विवाह केला होता. तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, सुखी संसार सुरू असतानाच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतर तिच्या आईचं निधन झालं. भाग्यश्रीची आई गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. भाग्यश्रीच्या माऊलीची ती झुंज अपयशी ठरली. त्यांची प्राणज्योच मालवली. आईच्या निधनानंतर भाग्यश्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीच्या आईला ऑटो इम्युन नावाचा गंभीर आजार झाला होता. याच आजारामुळे भाग्यश्रीच्या आईचे निधन झाले. तिनं आईच्या निधनानंतर आपले दु:ख पोस्टद्वारे व्यक्त केले. तिनं पोस्टमध्ये लिहिलं की, "आई.. लग्नाला माझ्या आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोन वर्षात मला एकही फोन केला नाही. सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखं फोन करू नये, यासाठी आईनं फोन करणं टाळलं. आईचा फोन सारखा आला तर, मुलीचं संसारात लक्ष लागत नाही. अशा मताची माझी आई होती. लग्नानंतर एकही फोन न करता माझी आई देवाघरी गेली".
"लग्नाला माझ्या दोन महिनेही झाले नाही. तू मला सोडून गेलीस. मला शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहायचं होतं. मला लग्न करायचं नव्हतं. तेव्हा तू म्हणाली होतीस की, राणा तू माझ्यासाठी लग्न कर. माझं काही पण होवो. पण तू मागे वळून पाहायचं नाही. तू आता तुझा विचार कर, माझ्यासाठी इतकं कर..खूप ठाम निर्णय होता तिचा.. एका भेटीत तिनं मला लग्नाचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. केवळ आई सांगते, म्हणून तिच्या इच्छेसाठी मी लग्न करण्यास तयार झाले. आज तू गेल्यावर मला कळलं, माझ्यासाठी तू निवडलेला मुलगा किती योग्य आहे", असं म्हणत भाग्यश्रीनं भावना व्यक्त केल्या.
"माझा संसार पाहण्यासाठी तू आज हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करणार? मला तू असं सोडून का गेलीस? तुला सगळं ठाऊक होतं, म्हणून तू माझी योग्य सोय करून गेलीस. आईला लेकराचं चांगलंच कळतं. आई, तू सांगितल्याप्रमाणे मी मागे वळून पाहणार नाही. हे माझं तुला वचन आहे", असं भाग्यश्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
