Bhagwat Chapter One Raakshas Movie: ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) नुकताच रिलीज झालेला सिनेमा म्हणजे, 'भागवत चॅप्टर 1: राक्षस' (Bhagwat Chapter One Raakshas) सध्या चर्चेत आहे. अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) या सिनेमात दिसणार आहेत. 2 तास 7 मिनिटांच्या या क्राईम थ्रीलर सिनेमाच्या (Crime Thriller Movie) सप्सेन्स, इमोशन्स आणि दमदार अभिनयाचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे. दिग्दर्शक अक्षय शेरचा हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि IMDb वर याला 7.4 रेटिंग मिळालं आहे. फिल्ममध्ये अर्शद वारसी आणि जितेंद्र कुमार यांनी आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडलीय. या सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 

Continues below advertisement


19 मुलींचा खून आणि एका भयावह सत्याचा शोध 


फिल्मची सुरुवात होते, इन्स्पेक्टर विश्वास भगवत (अरशद वारसी)पासून, ज्याला एक बेपत्ता मुलीची केस सोपवली जाते. पण, जसजसा तपास पुढे जातो, प्रकरण गुरफटत जातं. आता खुलासा होतो की, 19 मुलींची हत्या करण्यात आलीय. 19 मुलींना क्रूरतेनं मारणारा हत्यारा खूपच चलाख असतो. जो मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि नंतर त्यांना मारुन टाकतो. पोलीस शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पण, हत्यारा प्रत्येकवेळी पोलिसांच्या हातून निसटून जातो. उत्तर प्रदेशच्या  रॉबर्ट्सगंजमधली ही कहाणी ना फक्त खुन्याचा चेहरा शोधते, तर समाजात दडलेल्या अंधाराचाही सामना करते. 


जितेंद्र कुमारचा खतरनाक अंदाज 


अरशद वारसीनं इंस्पेक्टर भागवतच्या भूमिकेत जबरदस्त परफॉर्मंन्स दिलाय. त्यांनी एका थकलेल्या संवेदनशील पोलीस ऑफिसरची भूमिका शानदाररित्या साकारली आहे. तर, 'पंचायत'च्या 'सचिव जी' यांच्या नावानं प्रसिद्ध असलेला जितेंद्र कुमार यानं यावेळी आपली कॉमन मॅनच्या भूमिकांना छेद देऊन खतरनाक भूमिका साकारली आहे. त्यानं एका मुरलेल्या खलनायकाची भूमिका साकारुन सर्वांना धक्का दिला आहे. फिल्मचं ब्रॅकग्राउंज म्युझिक, सिनेमेटोग्राफी आणि रियल लोकेशनची कहाणी या सिनेमाला आणखी दमदार बनवते. 


पाहा ट्रेलर : 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ayushmann Khurrana Charged Rs 1 For Movie Andhadhun: हिरोनं फिल्मची स्टोरी ऐकल्यानंतर फी म्हणून घेतला फक्त रुपया; त्यात काळजाचा ठोका चुकवणारा सस्पेन्स, 32 कोटींमध्ये कमावले 456 कोटी