Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर (Delhi Bomb Blast) तपास वेगाने सुरू असताना, या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कारबाबत पुलवामामधून मोठा दावा समोर आला आहे. दिल्ली स्फोटासाठी वापरलेल्या i-20 कारचा चालक म्हणून नाव आलेल्या मोहम्मद उमरच्या कुटुंबीयांनी या घटनेत वापरण्यात आलेली कार आमची नसल्याचा दावा केलाय. 

Continues below advertisement

उमरच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, “घटनेत वापरलेली कार आमची नाही. आमची कार अजूनही घराबाहेर उभी आहे. हरियाणा पासिंग नंबरची कोणतीही गाडी आमच्याकडे नाही. आमची मुलं कधीच दिल्लीत गेली नाहीत. उमर हा पुलवामामध्येच प्लंबिंगचं काम करतो,” असे त्यांनी म्हटले आहे. 

Delhi Bomb Blast News: दिल्ली स्फोट प्रकरण : तपासात काय समोर आलं?

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता i-20 कारमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 24 जण जखमी झाले. स्फोट इतका प्रचंड होता की काही मृतांच्या शरीराचे तुकडेही दूरवर उडाले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही i-20 कार काश्मीरमधील पुलवामाच्या मोहम्मद उमर या व्यक्तीच्या नावावर होती आणि कारमध्ये अमोनियम नायट्रेटसारखी शक्तिशाली स्फोटके असल्याचे आढळले. सुरक्षायंत्रणांना या स्फोटाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मोहम्मद उमर हा फरीदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशीही संबंध असल्याचे समजते. दिल्ली पोलिस आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) या दोन्ही संस्था आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Continues below advertisement

Delhi Bomb Blast News: i-20 कारबाबत माहिती

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरलेली i-20 कार सुरुवातीला सलमान नावाच्या व्यक्तीने 2014 मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर त्याने ती ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली. देवेंद्रने ती अंबालातील आणखी एका व्यक्तीला विकली. अखेरीस ही कार जम्मू-काश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली. या साखळीतून ही कार अखेरीस उमर किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....

Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी