Best Suspense Thriller Web Series: सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्स (Netflix) ,सोनी लिव्ह (Sony Liv), हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. जाणून घेऊयात ओटीटीवरील  वेब सीरिज ज्या तुमचे मनोरंजन करतील...


द फॅमिली मॅन-2 (The Family Man 2)
प्राइम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन-2 या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये सस्पेंस, थ्रिलर आणि अॅक्शन अशा सर्व गोष्टी आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन  राज आणि डीके यांनी केले आहे. द फॅमिली मॅन-2 मध्ये समंथा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


Special Ops 1.5: The Himmat Story
12 नोव्हेंबर रोजी  स्पेशल ओप्स 1.5 ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. के के मेनन यांनी हिम्मत सिंह या रॉ एजंटची भूमिका स्पेशल ओप्समध्ये साकारली होती. स्पेशल ओप्सच्या पहिल्या सिझनमध्ये करण टॅकर, सना खान, दिव्या दत्ता, सय्यामी खेर, विनय पाठक या कलाकारांनी प्रमुख महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर  दुसऱ्या सिझनमध्ये आफताब शिवदासानी, आदिल खान, गौतमी कपूर, परमीत सेठी आणि विजय विक्रम सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नीरज पांडे आणि शिवम नायर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.   


हॉटेल मुंबई (Hotel Mumbai) 
ताज हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी अनेक विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये राहात होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहुण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11) 
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स तसेच इतर स्टाफने कशी परिस्थिती हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.