मुंबई : सप्टेंबर 2019 साली प्रदर्शित झालेला 'The Family Man'चा बहुप्रतीक्षित दुसरा सीजन 4 जूनला प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या आगामी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्यसभा खासदार वायको यांनी या वेब सीरिज बंदी घालावी अशी मागणी करणारे पत्र माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिले आहे. या पूर्वी एनटीकेचे संस्थापक सीमन यांनी देखील बंदी घालण्याची मागणी केली होती.
राज्यसभा खासदार वायको यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या वेब सीरीजमध्ये जाणीवपूर्वत तमिळ नागरिक दहशतवादी असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच त्यांचे संबंध पाकिस्तानशी असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच तामिळ अभिनेत्री सामंथा एक दहशतवादीच्या भूमिकेत दाखवले आहे आणि तिचे संबंध पाकिस्तानशी असल्याचे दाखवले आहे. अशा पद्धतीने तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. या तामिळ लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.
वायको पुढे म्हणाले, या सर्व गोष्टींचा विचार करता या मालिकेवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तातडीने बंदी घालावी. पत्राच्या शेवटी लिहिले की, जर या सीरीजवर बंदी नाही तर सरकारला यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मनोज वाजपेयी अभिनीत 'मोस्ट अवेटेड द फॅमिली मॅन 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. सीरीजच्या पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहते दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत होते. ट्रेलर पाहून चाहते आता सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.