Bahubali fame Rana Daggubati : अभिनेता प्रभास याचा बाहुबली हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आज देखील तेवढाच लोकप्रिय आहे. याच चित्रपटामुळे राणा डग्गुबतीला सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली. (Bahubali fame Rana Daggubati) खलनायक भल्लालदेवची भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. मात्र पडद्यावर ताकदवान दिसणाऱ्या या अभिनेत्याची खऱ्या आयुष्यातली कहाणी अधिक कठीण आणि प्रेरणादायी आहे. (Bahubali fame Rana Daggubati)

Continues below advertisement


सध्या राणा आपल्या ओटीटी मालिकेच्या, ‘राणा नायडू 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही मालिका 13 जून, म्हणजेच आजपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. याच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याने आपल्या आरोग्याविषयी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या, ज्या कोणालाही अचंबित करू शकतात. (Bahubali fame Rana Daggubati)


एका डोळ्याने दिसत नाही…


राणा दग्गुबातीने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला एका डोळ्याने दिसत नाही. त्याने हसत सांगितले, “आता हा तर विनोदच बनला आहे… जेव्हा मी अ‍ॅक्शन सीन करतो, तेव्हा फार अडचण होते.” (Bahubali fame Rana Daggubati)


शूटिंग दरम्यान धूळ असेल किंवा लेंसशिवाय राहणं त्याच्यासाठी त्रासदायक असतं. पण तरीही त्याने कधीही याला आपली कमजोरी बनू दिलं नाही.


अल्लू अर्जुनशी घडलेला मजेदार किस्सा


राणाने एक मजेदार किस्साही शेअर केला. एकदा अल्लू अर्जुन त्याच्याकडे बघत म्हणाले – “तू रडतोयस का?” यावर राणा चिडून म्हणाला – “नाही रे, ही माझ्या डोळ्यांतली पाणी आहे… मला उजव्या डोळ्याने दिसत नाही.” (Bahubali fame Rana Daggubati)


राणाने हेही उघड केलं की त्याच्यावर कॉर्निया आणि किडनी ट्रान्सप्लांट झाले आहेत. त्याने हसत म्हटलं – “आता माझ्याकडे डोळाही आहे, किडनीही आहे, बऱ्याच गोष्टी ट्रान्सप्लांट झाल्या आहेत… मी आता टर्मिनेटर झालोय!”(Bahubali fame Rana Daggubati)


राणा म्हणतो की, अनेक लोक आपल्या शारीरिक त्रासाला लपवतात, त्याच्यात कोसळतात, पण त्याने मात्र त्या त्रासाला स्वीकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने हे सिद्ध केलं की खरा हिरो तोच असतो जो पडद्यामागेही लढतो – स्वतःशी, परिस्थितींशी – आणि शेवटी जिंकूनच परततो.(Bahubali fame Rana Daggubati)


आज राणा फक्त एक अभिनेता नाही, तर लाखो लोकांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने केवळ स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं नाही, तर आपल्या वैद्यकीय अडचणी असूनही धैर्याने जगायचं कसं, हेही शिकवलं.(Bahubali fame Rana Daggubati)


इतर महत्त्वाच्या बातम्या 


31 वर्ष जुना चित्रपट, 14 गाणे ठरले होते सुपरहिट, बैलगाडीतून लोक पोहोचायचे थिएटरमध्ये, महारेकॉर्ड बनवणारा सिनेमा