Baba Ramdev Comment On Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' स्टार शेफाली जरीवालानं (Shefali Jariwala) 27 जून 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 42 वर्षी शेफालीच्या अचानक जाण्यानं तिच्या मृत्यूबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलं नसलं तरीसुद्धा शेफालीचा मृत्यू अँटी-एजिंग सप्लिमेंट्स आणि दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शेफालीच्या मृत्यूबाबत पतांजली आयुर्वेदाचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी भाष्य केलं आहे. तसेच, त्यासोबतच निरोगी सवयींमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं वाढू शकतं? याबाबतही बाबा रामदेव यांनी भाष्य केलं आहे. पण, बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
पतंजली आयुर्वेदाचे संस्थापक आणि योग थेरपिस्ट बाबा रामदेव यांनी अभिनेत्री शेफाली जरीवालाबाबत बोलताना त्यांचा 'हार्डवेअर-सॉफ्टवेअर' दृष्टिकोन मांडला आहे. बाबा रामदेव यांनी 'एनडीटीव्ही'शी बोलताना सांगितलं की, "मानवानं आपला मेंदू, हृदय, डोळे आणि लिव्हरवर एवढं ओझं टाकलंय की, लोक आधी जेवढं अन्न 100 वर्षांत खायचे, ते आता फक्त 25 वर्षांत खात आहेत. मानवाला स्वतःची काळजी कशी घ्यावी? हे माहीत नाही. जर तुम्ही चांगल्या गोष्टी अवलंबल्या तर तुम्ही 100 वर्षांपर्यंत म्हातारे होणार नाही. खाण्या-पिण्यात शिस्त आणि उत्तम जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे."
त्यांचं हॉर्डवेअर ठीक होतं... पण सॉफ्टवेअर : बाबा रामदेव
नुकतंच अभिनेत्री शेफाली जरीवालानं फार कमी वयात जगाचा निरोप घेतला. तर, त्यापूर्वी सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40व्या वर्षी निधन झालेलं, दोघेही बिग बॉसचे स्पर्धक, दोघांच्याही अल्पावधीत झालेल्या मृत्यूबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, "त्यांचं हार्डवेअर ठीक होतं, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झालेला. लक्षणं ठीक होती, सिस्टीममध्ये बिघाड होता."
पुढे स्वतःचं उदाहरण देताना ते म्हणाले की, "एखाद्या व्यक्तीनं जीवनात पूर्णपणे समाधानी असलं पाहिजे. तुमचं अन्न, आहार, विचार आणि तुमची शारीरिक रचना योग्य असली पाहिजे. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीचं एक नैसर्गिक वय असतं. जेव्हा तुम्ही त्यात हस्तक्षेप करता तेव्हा अंतर्गत संकटं निर्माण करतात, ज्यामुळे हृदयविकारासारखी परिस्थिती निर्माण होते. जर एखादी व्यक्ती तिच्या मूळ डीएनएशी जोडलेली असेल तर ठीक आहे. या वरवरच्या दिसण्यात फरक आहे. एक दिसणं आणि एक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत."
हॉर्डवेअर, सॉफ्टवेअरच्या वक्तव्यानंतर बाबा रामदेव यांच्यावर टीकेची झोड
42 वर्षांच्या शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर बाबा रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सोशल मीडियावर निषेध होत आहे. नेटिझन्सनी त्यांच्या 'असंवेदनशील' शब्दांना हायलाईट करुन इन्स्टाग्राम पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
"तिच्या आत्म्याला शांती मिळो आणि तिच्या कुटुंबाला शांती लाभो. हा मूर्खपणा थांबवा," असं एका युजरनं लिहिलंय. आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मूर्खपणा थांबवा. तिच्या आत्म्याला शांती मिळो" तर एक युजर म्हणाला की, "कृपया तिला जाऊ द्या... गिधाडं देखील असं करत नाहीत... आप तिला वारंवार मारतोय, मग कारण काहीही असो, तिला जाऊ द्या...".
शेफालीच्या मृत्यूचं कारण नेमकं काय?
दरम्यान, शेफालीच्या मृत्यूचा तपास अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा मृत्यू झाला, त्याच्या काही तास आधी व्हिटॅमिन-सी IV ड्रिप घेतली होती. याबाबत तिची मैत्रीण पूजा घईनं एका मुलाखतीत बोलताना माहिती दिलेली. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलाय की, तिचा मृत्यू हॉर्ट अटॅकमुळे झालेला, लो ब्लड प्रेशरमुळे तिला हॉर्ट अटॅक आला. कारण तिनं उपवास धरलेला. त्यातच तिनं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटी-एजिंग सप्लीमेंट्स आणि स्किन ग्लो करण्यासाठी टॅबलेट्स घेतलेल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :