Baahubali The Beginning : प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या बाहुबली (Baahubali) या चित्रपटानं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 10 जून 2015 रोजी बाहुबली चित्रपटाचा पहिली पार्ट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभासनं प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रभासला (Prabhas) या चित्रपटामुळे जगभरात लोकप्रियता मिळाली. पण चित्रपटाचे 250 दिवस शूटिंग केल्यानंतर प्रभासनं हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीमध्ये प्रभासनं याबद्दल सांगितलं होतं. 


काय म्हणाला प्रभास?


'बाहुबली : द बिगिनिंग' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागला. अशा परिस्थितीत शूटिंगच्या शेड्यूलमुळे प्रभास वैतागला होता. एका मुलाखतीमध्ये प्रभासनं सांगितलं की, 250 दिवस शुटिंग केल्यानंतर हा चित्रपट सोडण्याचा निर्णय प्रभास घेतला. तो म्हणाला, 'मी 250 दिवस या चित्रपटाचे शूटिंग केले. त्यानंतर मी वैतागलो.  मी हा चित्रपट सोडण्याचा विचार केला. मी राजामौली यांनी फोन केला आणि सांगितलं की जेवढा चित्रपट तयार आहे, तेवढा मला दाखवा. त्यानंतर त्यांनी मला चित्रपट दाखवला. त्यानंतर मला वाटलं की हा चित्रपट चांगला होणार आहे. या चित्रपटासाठी करिअरमधील सात वर्ष देण्यासाठी देखील मी तयार झालो.' 


चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ 


बाहुबली या चित्रपटामध्ये राणा दग्‍गुबती, तमन्‍ना भाटिया, अनुष्‍का शेट्टी, राम्‍मा शेट्टी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. प्रेक्षक प्रभासच्या आदिपुरुषा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  प्रभासचे  बॅक टू बॅक दोन  चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. 2019 मधील 'साहो' आणि दुसरा 'राधे श्याम' हे चित्रपट प्रभासचे फ्लॉप ठरलेले चित्रपट आहेत. 


हेही वाचा: