#AyodhyaVerdict: बॉलिवूडकरांचे भारतीयांना आवाहन; आपण एक होतो एकच राहू
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2019 01:36 PM (IST)
देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले असून भारतीयांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : अयोध्येतील वादावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जमीन राम मंदिराची असल्याचा निकाल देत मुस्लीम समाजालाही अयोध्येत पर्यायी जागा देण्याचे कोर्टाने सांगितले आहे. या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले आहे. सोबतच सर्वांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहनही सेलीब्रीटींनी केले आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. अयोध्येतील वादग्रस्त खटल्यावर निकाल देताना वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचे सांगत मशिदीला पर्यायी 5 एकर जमीन देण्याचा आदेश दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे बॉलीवूडकरांनी स्वागत केले आहे. सोबतच सर्वांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेता फरहान अख्तर - अभिनेता फरहान अख्तरने ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. "सर्वांना विनंती आहे, आज येणाऱ्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. हा निर्णय तुमच्या बाजून असला किंवा नसला तरी त्याचा स्वीकार करा. कारण आपल्या देशाला या सर्वातून वर येण्याची गरज आहे, जय हिंद", असे ट्विट त्याने केले आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी - तर, "माझ्या प्रिय भारतीयांनो सर्वांना विनंती आहे, की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निर्णयचा सन्मान करा. आपल्या सर्वांना एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज आहे"., असे ट्विट करत अभिनेत्री हुमा कुरेशी हिने म्हटले आहे. लेखक चेतन भगत - लेखक चेतन भगत यांनीही आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "कोणीही असो, देवाची शांती भंग करण्याची कोणाचीही इच्छा नसते. याला अशाच प्रकारे ठेवा, अयोध्या" आणखी काही प्रतिक्रिया : -