David Warner To Make Acting Debut In Telugu Film: काही दिवसांपूर्वी  इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा लिलाव पार पडला. या लिलावात मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट घडली, ती म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज (Australia's Batsman) डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) कोणत्याही संघानं बोली लावली नाही. आपल्या फलंदाजीनं अनेक गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या डेव्हिड वॉर्नरसाठी कोणीच बोली न लावल्यामुळे अनेक  क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर जेवढा आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच तो सोशल मीडियावरील त्याच्या रिल्ससाठीही चर्चेत असतो. 

डेव्हिड वॉर्नरच्या रिल्सची एक खासियत म्हणजे, तो भारतातील विविध भाषांमधील गाण्यांवर जास्त रिल्स करतो. एवढंच काय तर, त्या गाण्यांमधील हुक स्टेप्सनी तो सर्वांची मनंही जिकंतो. डेव्हिडच्या या अदांचे फॅन  आरआरआरचे दिग्दर्शक राजामौलीही झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी डेव्हिडसोबत एक जाहिरातही केली. अशातच आयपीएल लिलावात डेव्हिड वॉर्नरवर कुणीच बोली लावली नसल्यानं, चाहत्यांच्या पदरी निराशा आली असली तरी, दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातून एक मनोरंजक बातमी आहे. खरंतर, डेव्हिड वॉर्नर साऊथ चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.  

अल्लू अर्जुनसोबत ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2: द रुल' बनवणारे मॅथ्री मूव्ही मेकर्स त्यांचा पुढील चित्रपट 'रॉबिनहुड' मध्ये डेव्हिडला लॉन्च करण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान निर्मात्यांनी याचा खुलासा केला आहे. डेव्हिड वॉर्नर लवकरच नितीन आणि श्रीलीला यांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची बातमी आहे.

डेव्हिड वॉर्नर IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळायचा

'रॉबिनहुड'चे दिग्दर्शन वेंकी कुडुमुला करत आहेत. डेव्हिड वॉर्नरचे दक्षिण भारतात खूप मोठे चाहते आहेत. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून अनेक वर्ष खेळला आहेच, तसेच तो या संघाचा कर्णधारही होता. 

'रॉबिनहुड' 2024 मध्येच रिलीज होणार होता, पण... 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, मिथ्री मूव्ही मेकर्सचे रविशंकर यांनी ही माहिती शेअर करताना सांगितलं की, हे गुपित उघडपणे सांगण्यात टाळाटाळ करत होते. 'रॉबिनहुड' हा चित्रपट आधी 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलजी डेट पुढे ढकलण्यात आली. असं मानलं जातं की, यामागील कारण 'पुष्पा 2' होतं. 

ब्रेट लीनंही चित्रपटांमध्ये केलंय काम 

तसेच, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू भारतीय चित्रपटात अभिनेता म्हणून दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ब्रेट लीनंही 'अनइंडियन' या इंडो-ऑस्ट्रेलियन चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तसेच, डेव्हिड वॉर्नरनं सोशल मीडियावर प्रेक्षकांची मनं कशी जिंकायची, हे चांगलंच माहिती आहे. 

'रॉबिनहुड' च्या रिलीजची डेट 

'रॉबिनहुड' या महिन्यात 28 मार्च 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. 'चलो' आणि 'भीष्म' नंतर दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांचा नितीनसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपटही ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Singer Kalpana Raghavendar Attempted Suicide: प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन दिवसांपासून बंद घर, दरवाजा तोडल्यानंतर बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली