Atul Kulkarni on Cockroach Janata party Protest Delhi: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर कॉकरोच जनता पक्षाची( Cockroach Janata party) एकच चर्चा सुरू आहे. देशाच्या राजधानीत कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला अधिकृत परवानगी मिळाली आहे.त्यामुळे आज जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. या पक्षाचेसंस्थापक अभिजीत दीपके( Abhijeet Dipake) अमेरिकेतून राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अभिनेता अतुल कुलकर्णी( Atul Kulkarni) यांनी दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

Continues below advertisement

Atul Kulkarni: काय म्हणाले अतुल कुलकर्णी? 

जंतर-मंतर वरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी देशातील युवा नागरिकांना संबोधत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले," माझ्या युवा नागरिकांनो, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.तुम्ही तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि तुमच्या हक्कांसाठी उभे राहण्याची तयारी करत आहात.माझ्या पिढीने, तसेच माझ्या आधी आणि माझ्या नंतरच्या पिढ्यांनीही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नेहमीच योग्य प्रकारे पार पाडल्या, असे झालेले नाही.आमच्याकडून चुका झाल्या आहेत.अनेक बाबतीत आम्ही मोठी मोठी आव्हाने पुढे ढकलली आणि त्यांचा वारसा आता तुम्हाला मिळाला आहे. त्यासाठी मी तुमची माफी मागतो.स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा या देशाचा आत्मा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आणि प्रत्येकाविषयी करुणा बाळगत या समाजाला आणि या देशाला नवे रूप द्याल .तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. -अतुल कुलकर्णी "अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी

कॉकरोच जनता पार्टीने देशातील परीक्षांमधील गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, कोचिंग क्लासशी संबंधित नागरिक दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी दिल्ली जिल्ह्याची 12 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संसद मार्ग, जंतरमंतर आणि संवेदनशील भागात 2,000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.