Atlee Kumar Second Baby Girl: साऊथ सिनेमातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शकाच्या घरात पुन्हा एकदा बाळाचे आगमन (Baby Girl) झाले आहे. अॅटली दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झाली आहे. अॅटलीची पत्नी कृष्णा प्रियाने (Krushna Priya) एका लहान मुलीला जन्म दिला आहे. अॅटली आणि प्रियाने सोशल मीडियावर याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अॅटली कुमार दुसऱ्यांदा वडील झाला (Atlee and Krishna Priya welcome daughter)
अॅटली आणि त्याची पत्नी प्रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये कपलचा मोठा मुलगा मीर दिसत आहे. पोस्टमध्ये मीर एका कारवर बसलेला दिसत असून, त्यानं मोठा भाऊ झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. मीरने सांगितलं की, तो आता लहान बहिणीचा मोठा भाऊ झाला आहे. कपलने पोस्ट शेअर करुन या फोटोला गोड कॅप्शनही दिलं आहे. 'फीलिंग ब्लेस्ड' अशी पोस्टला कॅप्शन दिलं आहे.
कपलने सोशल मीडियावर 'Feeling Blessed' अशी पोस्ट शेअर केली आहे (Atlee Kumar Welcomes Baby Girl)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार तसेच दिग्गजांनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील काजल अग्रवाल, समंथा रुथ प्रभु, अनन्या पांडे या कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काजलने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, 'अभिनंदन.. चिमुकलीला खूप सारं प्रेम. या कपलला खूप साऱ्या शुभेच्छा'. 2014 साली एटली आणि प्रिया लग्नबंधनात अडकले होते.
बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 साली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 8 वर्षांनंतर डिसेंबर 2022 साली त्यांनी पहिल्यांदा प्रेग्नेंसीची घोषणा केली. 31 जानेवारी 2023 साली कपलने मीर नावाच्या मुलाचे आपल्या आयुष्यात स्वागत केले. दरम्यान, आता दुसऱ्यांदा ते पालक झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?
