स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पहिले गाणे रेकॉर्ड केले-
आतिफ अस्लमने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा माझ्या भावाने त्याला नुसरत फतेह अली खानशी ओळख करून दिली तेव्हापासून माझे आयुष्य बदलले. नुसरत फतेह अली खानसोबत ओळख झाल्यानंतर आतिफ अस्लम संगीत क्षेत्राच्या जवळ येत गेला. त्यानंतर हळूहळू त्याला गाण्याची आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे आतिफ अस्लमने त्याच्या मोकळ्या वेळेत त्याच्या खिशातील पैशातून लिहिलेले एक गाणे रेकॉर्ड केले होते. मी माझे पहिले गाणे 'आदत' स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून रेकॉर्ड केले. आदत गाण्याचा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी एक म्युझिक व्हिडीओ बनवला आणि इथूनच माझी खरी संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरु झाली, असं आतिफ अस्लम म्हणाला.
आतिफ अस्लम 180 कोटी रुपयांचा मालक-
आज आतिफ अस्लमला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्याकडे संपत्तीचीही कमतरता नाही. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, आतिफ अस्लमकडे 180 कोटी रुपयांची मालमत्ता आहे ज्यामध्ये एक आलिशान बंगला आणि आलिशान गाड्यांचा समावेश आहे. आतिफ अस्लमने 2013 मध्ये सारा भरवानासोबत लग्न केले. सध्या आतिफ अस्लम आणि साराला 2 मुले आणि एक मुलगी आहे.