Ata Hou De Dhingana : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आता होऊ दे धिंगाणा (Ata Hou De Dhingana) या धमाल कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय राहत नाही. या थीमवर आधारित हा रिअॅलिटी शो आहे. या शो ची रंगत वाढविण्यासठी आता नायक-नायिका येणार आहेत. 


दिवाळीचा (Diwali 2022) सण सगळीकडे सुरु झाला आहे. आणि आता याच दिवाळीची रंगत वाढविण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीचे नायक-नायिका दिवाळीचा हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व नायक-नायिका कलाकार यावेळी एकत्र येऊन धिंगाणा घालताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


सिद्धार्थ जाधवची धम्माल कॉमेडी :


आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय. सिद्धार्थच्या भन्नाट सूत्रसंचालनाच्या स्टाईलने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. या आठवड्यात देखील विविध खेळ, अंताक्षरी, आणि स्पर्धांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंकाच नाही.


पाहा व्हिडीओ : 



10 सप्टेंबरपासून स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सुरुवातील मालिका विरूद्ध मालिका अशी या कार्यक्रमाच्या थीमचा प्रवास आता नायक-नायिकांवर येऊन पोहोचला आहे. मनमोकळ्या गप्पा, धम्माल किस्से आणि भन्नाट जुगलबंदी अशा प्रकारची थीम असलेल्या हा कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.


तब्बल दोन वर्षांनंतर दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जातोय. यामध्ये मनोरंजन सृष्टीही कुठे मागे नाही. हाच अनुभव देणारा आजचा आणि उद्याचा आता होऊ दे धिंगाणाचा हा एपिसोड असणार आहे. त्यामुळे कडकडीत कंदील विरूद्ध चुणचुणीत पणत्यांचा हा धम्माल कार्यक्रम दर शनिवारी आणि रविवारी स्टार प्रवाह वाहिनीचा भन्नाट रिअॅलिटी शो आता होऊ दे धिंगाणा नक्की पाहा. 


महत्वाच्या बातम्या : 


International Film Festival: शेर शिवराज, आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स; 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी