Ashwini bhave : अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांचा घरत गणपती हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा नुकतचा टीझर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी सिनेमातील कलाकारांनीही धम्माल केल्याचं पाहायला मिळालं. पण एका गोष्टीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशी ही बनवाबनवी सिनेमातील अश्विनी भावे यांची लिंबू रंगाची साडी ही आजही प्रसिद्ध आहे. त्याच गाण्यावर त्यांनी रील केलं.
काही दिवसांपूर्वी आलेलं गुलाबी साडी हे गाणं अजूनही खूप गाजतंय. माधुरीपासून अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल केलं. आता अश्विनी भावेंना देखील या गाण्यावर रिल करण्याचा मोह आवरला नाही. पण यामधील गुलाबी साडी ही अश्वनी भावे यांच्यासाठी लिंबू कलरची साडी झाली. सिनेमाची दिग्दर्शक वज्योत बांदिवडेकरच त्यांच्या या व्हिडीओसाठी व्हिडिओग्राफर झाल्याचं पाहायला मिळालं.
तगडी स्टारकास्ट असलेला 'घरत गणपती'
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. येत्या 26 जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट
'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.