Horoscope Today 16 July 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 16 जुलै 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज काही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. गणरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज भाग्याची साथ चांगली मिळणार आहे बिनधास्त पणा तर तुमच्या नसानसातच भिनलेला आहे त्याचा उपयोग करून घ्या.य

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक तुमच्यात येईल घरामध्ये बदल करायचा आहे त्यांनी कामाला लागावे.     

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज भावनाप्रधान होऊन निर्णय घ्याल परंतु तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागत होईल.      

कर्क रास (Cancer Horoscope Today)

व्यवसाय धंद्यात आर्थिक स्थिती जेमतेम राहील अपेक्षित पैसे लवकर हाती पडणार नाहीत.     

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज स्पर्धक तुमचा फायदा उठवतील महिलांना सर्व बाबतीत  तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

स्वतः निर्णय घेण्याची क्षमता राहील कोणाचा सल्ला किंवा नियंत्रण तुम्हाला रुचणार नाही.      

तूळ रास (Libra Horoscope Today)

योग्य असल्याचा आधार तुम्ही निश्चित कराल पैशाबाबत उदार आणि खर्चिक बनाल.    

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

बोलण्यामध्ये अहंकार जाणवेल नेत्रविकाराला तोंड द्यावे लागेल.     

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

घशाच्या विकारासाठी डॉक्टरला भेट द्यावी लागेल एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने दिवस सांभाळा.  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

तुमच्या कलागुणांना वाव मिळून ते सादर करण्याचा आनंद मिळवाल.      

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

दुसऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळात मदत कराल शिवाय आज सखोल चिंतन कराल.    

मीन रास (Pisces Horoscope Today)

कोणतेही काम करताना अविचार हातून घडणार नाही याची काळजी घ्या महिलांनी चुकीचे निर्णय घेऊ नयेत.

हेही वाचा :                          

Lucky Zodiac Signs : 16 जुलैच्या दिवशी 'या' राशींना पावणार गणराया; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट