Ashok Saraf Shared Memories with Sunil Gavaskar : मराठी माणसाचं जितकं प्रेम सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या बॅटींगवर आहे, तितकचं प्रेम अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या अॅक्टिंगवर आहे. एकाने मैदानावर खेळ रंगवला तर दुसऱ्याने रंगभूमीवर. त्यामुळे सुनील गावस्कर आणि अशोक सराफ ही दोन्ही मंडळी किक्रेटप्रेमींच्या आणि रसिकप्रेक्षकांच्या फार जवळची वाटतात. पण या दोन्ही दिग्गज मंडळींमध्ये एक खास कनेक्शन आहे. इतकच नव्हे तर या दोघांनीही मिळून लहानपणी क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला आहे. 

Continues below advertisement

अशोक सराफ यांनी नुकतीच focusedindian या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये अशोक सराफ यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच सुनील गावस्कर यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचीही आठवण यावेळी अशोक सराफ यांनी शेअर केली आहे. 

अशोक सराफांनी शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

अशोक सराफांनी या मुलाखतीदरम्यान त्यांच्या क्रिकेटच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, तुम्हाला माहितेय लहानपणी आम्ही क्रिकेट कुणासोबत खेळायचो? आम्ही सुनील गावस्करसोबत क्रिकेट खेळायचो. ज्या प्रकारे सुनील शॉट मारायचा तो बॉल धावत धावत जाऊन आणेपर्यंत आमचा व्यायाम व्हायचा. सुनील गावस्कर स्ट्रेट ग्राऊंड शॉट मारण्यात पटाईत होता. त्यात आम्ही गल्लीत खेळायचो. सुनील माझ्या शेजारी राहायचा. त्यावेळी सुनीलने शॉट मारताना काचाही फोडल्या आहेत. त्यामुळे काचा फोडायच्या नाहीत म्हणून तो बॉल उचलून ग्राऊंड शॉट मारायचा. 

Continues below advertisement

अशोक सराफांनी शेअर केला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

अशोक सराफांनी या मुलाखतीमध्ये अशोक सराफांना कधी तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोकांना हसायला आलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक सराफांनी म्हटलं की, होय असं झालंय. कारण मी भूमिकाच अशा केल्या आहेत की, लोकांना माझ्याकडे पाहून हसायला येतं. विशेष म्हणजे शरद पवारांसारखा गंभीर व्यक्तिमत्वाचा माणूसच माझ्याकडे बघून हसला म्हणजे काय बोलायचं. मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होते. पुढे स्टेजवर जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा फोटो काढले आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, साहेब तुम्ही अजूनही ओळखता वाटतं मला.    

ही बातमी वाचा :           

Salman Khan : 'सिंघम'धील 'दबंग' एन्ट्रीवर पूर्णविराम, सलमान खान नाही दिसणार रोहित शेट्टीच्या सिनेमात