Ashok Saraf reaction on Sachin Pilgaonkar trolling: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मात्र, त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. त्यांच्यावर नेटकरी मिम्स तयार करतात. तसेच सोशल मीडियात शेअर करतात. मुलाखतीत सचिन पिळगावकर आपले किस्से शेअर करतात. त्यांना त्यांच्या वक्तव्यावरुन ट्रोल केलं जातं. त्यांनी बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना केला आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. 'सचिनला ट्रोलिंग केलं जातं, त्याचं वाईट वाटतं', असं अशोक मामांनी म्हटलंय.
एका मुलाखतीत अशोक मामा म्हणाले, "सचिनला ट्रोल केलं जातं, त्याचं मला वाईट वाटतं. कारण त्याला जे काही मिळालं आहे, ते सहजासहजी मिळालेलं नाही. त्यानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत खूप अभ्यास केला आहे. तरूणपणीच त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यानं दिग्दर्शनाचीगी धुरा सांभाळली. त्याला संगीत, गायनही येतं. तो एडिटिंग सुद्धा करू शकतो".
"नेटकरी इतर लोक त्याला त्याच्या बोलण्यावर ट्रोल करतात. कुणी त्याच्याकडे असलेल्या ज्ञानावर ट्रोल करा. एकाला तरी जमेल का? कारण मुळात लोकांना माहितच नाही, तो नेमका काय करतो अन् काय नाही", असं अशोक सराफ म्हणाले. "आजकाल कुणालाही ट्रोल करणं हा छंद झाला आहे. लोक ट्रोल करतात, काही दिवसांनंतर विसरुनही जातात. ट्रोलवर कोण कसं प्रतिक्रिया देतंय, याची वाट बघत असतात", असंही अशोक मामा म्हणाले.
मराठी इंडस्ट्रीत सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाले आहे. त्यांनी अनेक हिट मराठी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे. दरम्यान, अशोक मामांचा साडे माडे तीन 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
45 कोटींचं बजेट, 1 लाखांचीच कमाई; महाफ्लॉप सिनेमामुळं ‘या’ मराठी अभिनेत्रीची अवस्था बिकट