Ashish Shindes Scorpio Car Set on Fire by Unknown Person: पाखरा आझाद केलं तुला, या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेला गीतकार आशिष शिंदे संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.  गीतकार आशिष शिंदेच्या स्कॉर्पिओ वाहनाला आग लागली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शिंदेचा ड्रायव्हर प्रतीक कांबळे याने स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग करून ठेवली होती. अज्ञात व्यक्तीनं  वाहनाला आग लावली.  या आगीमुळे शेजारी उभी असलेले गाडी देखील जळून खाक झाली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

नेमकं काय घडलं काय?

गीतकार आशिष शिंदेचा चालक प्रतीक काबंळे याने स्कॉर्पिओ वाहन कशेळी येथील रस्त्याच्या कडेला उभी केली होती. स्कॉर्पिओच्या शेजारी बरेच वाहन उभे होते.  दरम्यान, रात्रीच्या सुमारास आलिशान स्कॉर्पिओ वाहनाला आग लावली.  एका अज्ञात व्यक्तीनं आग लावली असल्याची माहिती समोर आली आहे.   या आगीनं क्षणात रौद्ररुप धारण केलं. गाडीनं भयंकर पेट घेतला होता.  आग इतकी भयंकर लागली होती की, शेजारच्या गाडीनं देखील पेट घेतला. 

स्कॉर्पिओला लागलेल्या आगीमुळे जवळ उभ्या असलेल्या गाड्यांचेही प्रचंड नुकसान झाले.  इतर वाहनही जळून कोळसा झाले आहेत.  या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग विझवण्याचा प्रयत्न केला.   या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.   यानंतर नारपोली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली,  तसेच पंचनामा केला.  दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली? आग लागण्यामागचं कारण काय? शॉर्ट सर्किट की आणखी कोणत्या कारणामुळे आग लागली? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.  सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. 

आशिष शिंदे नेमके आहेत तरी कोण?

 

गीतकार आशिष शिंदे हे मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेले  कलाकार आहेत. त्यांची गाणी सोशल मीडियात व्हायरल होतात. त्याचं पाखरा आझाद केलं तुला,  हे गाणं प्रचंड गाजलं. हे गाणं आजही लोक आवर्जून ऐकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गुलाबी साडी अन् लाली लाल..; सानियाच्या लग्नात नणंदबाई मिरवल्या, सारा तेंडुलकरच्या लूकवर खिळल्या नजरा, PHOTOs