Celebrities in Ashish Shelar Campaingn :  अवघ्या काही तासांमध्ये थंडावणाऱ्या प्रचाराचा तोफा सध्याच्या घडीला मात्र प्रत्येक मतदारसंघात जोमाने धडकतायत. जोरदार भाषणं, होणारे वार-प्रतिवार या सगळ्यामध्ये मतदारांना आपल्या बाजूने वळवणं हाच प्रत्येकाचा सर्वोतोपरी मानस आहे. अगदी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीपासून राजकीय पक्षांनी कंबर कसली होती.त्यांच्यासाठी सेलिब्रेटीही प्रचाराच्या रिंगणात उतरले. भाजपचे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे (Bandra West Assembly Constituency) उमेदवार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासाठी कलाकारांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. 


ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते अजिंक्य देव, शरद पोंक्षे, नंदेश उमप, पुष्कर श्रोत्री, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे, अभिजित खांडकेकर, अभिनय बेर्डे, अभिनेत्री अमृता खानविलकर, श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, विशाखा सुभेदार, दिग्दर्शक विजू माने, विनोदवीर अरुण कदम, प्रभाकर मोरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, गौरव मोरे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या प्रचाराच्या दौऱ्यात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 


असा असणार प्रचाराचा मार्ग


सोमवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता वाजता सांताक्रूझ पश्चिम येथील हायलाईफ मॉलपासून प्रचार फेरीला सुरुवात होईल. पुढे खोतवाडी, संभाजी मैदान, गरोडिया नगर, मिलन सबवे रोड, साने गुरुजी रोड, दौलत नगर, शास्त्रीनगर, ओल्ड पोलीस क्वार्टर, जुहू रोड, एस.बी पाटील मार्ग, गजधन बांध, सिद्धिविनायक मंदिर, मरु आई मंदिर, शंकर व्यायाम शाळा, दांडपाडा नाका, सी डी मार्ग, दांडा नाका येथे पोचून श्रीराम मंदिर रोडजवळ ही रॅली संपेल. 


प्रचाराच्या रिंगणात सेलिब्रेटींची हवा


विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात सेलिब्रेटींच्या उपस्थितीची जोरदार चर्चा झाली. भाऊ कदम, सयाजी शिंदे, कुशल बद्रिके, वर्षा उसगांवकर यांसह बरेच कलाकार या प्रचाराच्या रिंगणात आहेत. रितेश देशमुख,किरण माने, शरद पोंक्षे, संजय नार्वेकर या कलाकारांनी संबंधित पक्षाच्या व्यासपीठावरुन अगदी खणखणीत भाषणं देखील केली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचारामध्ये सेलिब्रेटींनीही जोर लावल्याचं पाहायला मिळालं आहे.                                                            


ही बातमी वाचा : 


Sharad Pawar : 35-40 हजारांची गर्दी, साडेपाचची सभा,मुसळधार पाऊस अन्... मराठी अभिनेत्याने सांगितला शरद पवारांच्या 'साताऱ्यातील' सभेचा किस्सा