Bigg Boss 18:बिगबॉसच्या १८ व्या सिझनची  सुरुवातपासूनच जोरदार चर्चा आहे. मागच्या आठवड्यात विकेंड का वारमध्ये सलमानच्याऐवजी रोहित शेट्टी आणि एकता कपूर आल्यानं चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आता सलमान खान पुन्हा एकदा विकेंड का वार मध्ये परतला आहे. १६ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये सलमाननं दिग्विजय आणि अविनाशला चांगलंच फटकारल्याचं दिसलं. कलर्स टीव्ही ने बिग बॉसच्या घरातील शनिवार का वारचे highlights शेअर केले आहेत . 


तुम्ही माणसं फाडण्याविषयी बोलताय!?? सलमाननं खडसावलं


शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमानने ग्रँड एन्ट्री घेत चाहत्यांसह घरातील स्पर्धकांनाही सुखद धक्का दिला . सलमान घरात येताच त्याने दिग्विजय आणि अविनाश या दोघांची हजेरी घेतल्याचा दिसलं . सलमानने बिग बॉस मधील सदस्यांना कोण कोण जीन्स घालत असं विचारलं . त्यावर सगळेच जण जीन्स घालत असल्याचं स्पर्धकांनी सांगितलं . करणला आतून एक जीन्स आणायला सांगत सलमानने ती जीन्स अविनाशकडे द्यायला सांगितली . ही जीन्स फाडून दाखव अशी सूचना त्याने अविनाशला केली . त्याच्याकडून जीन्स न फाटल्याने दिग्विजयला फाडायला सांगितली . ही जीन्स आहे ती फाटते पण तुम्ही बिग बॉसच्या घरात माणूस फाडणे विषयी बोलत आहात !? असं म्हणत सलमानने अविनाश आणि दिग्विजय ला चांगलंच सुनावलं .


 






तुम्हाला भांडणाची आवड असेल तर   WWE मध्ये जा ..


तुम्ही या घरात माणसाला मधोमध फाडण्याची भाषा करत आहात . म्हणजे तुम्हाला तसा काही अनुभव असेल . असे म्हणत सलमान खानने दिग्विजय आणि अविनाशचा क्लास घेतला. तुम्हाला भांडणाची एवढी हौस असेल तर WWE मध्ये जा. असंही सलमान म्हणाला .तुम्ही कोणत्या शो मध्ये आला आहात असा सवाल करत WWE मध्ये आलास का  ? असं विचारत एवढी भांडणाची आवड असेल तर तू इथं कशाला आलास . तुम्हाला कोणाला इंप्रेस करायचंय . तुम्हाला बाहेर काढलं तर लहान मुलही तुम्हाला गुंडाळून निघून जाईल असे म्हणत सलमानने त्याच्या स्टाईलने या दोघांना सुनावल्याचं दिसलं . 


नेटकऱ्यांच्या प्रतिकिया काय ?


कलर्स टीव्ही ने शेअर केलेला या प्रोमोवर चाहत्यांना सलमानच्या वापसीवर आनंद झाल्याचा दिसलं . काही चाहत्यांनी दिग्विजय या घरातील स्ट्रॉंग स्पर्धक असल्याचं सांगत त्याची बाजू घेतल्याचं दिसलं .