मुंबई : तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एक नवा भारतीय गेमिंग अॅप लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे. परंतु, गेमर्सनी आता यावर मीम्स तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अॅक्शन गेमचं नाव फिअरलेस अॅन्ड यूनायटेड गार्ड्स असं असणार आहे. तसेच हा गेम पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला सपोर्टही करणार आहे. जसं अक्षय कुमारने या गेमबाबत घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पबजी बॅन केल्यानंतर फक्त दोन दिवसांच्या कालावधीतच हा गेम कसा तयार करण्यात आला, यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
अशातच आता सोशल मीडियावर या गेमसंदर्भात मीम्सचा महापूर आला आहे.
काय आहे अक्षयचं ट्वीट?