मुंबई : अंमली पदार्थांच्या प्रकरणात तुरुंगात असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजची रात्रही आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागणार आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जाबाबत आजचा युक्तिवाद संपला आहे. उद्या दुपारी 12 नंतर आरोपींच्या जामीनावर उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे.


सुनावणीदरम्यान एनसीबीने न्यायालयात आपली बाजू मांडली. एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, जरी आर्यन खानकडून बंदी घातलेला पदार्थ जप्त केला नसला तरी तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. एनसीबीने न्यायालयाला असेही सांगितले की आर्यन खानवर प्रतिबंधित पदार्थ वापरल्याचा आरोप आहे आणि तो बंदी असलेला पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आला आहे.


Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण


एनसीबीने न्यायालयात म्हटले की, एका आरोपीचे आरोप आणि इतरांवरील आरोप वेगळे केले जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणेने तर्क देऊन सांगितले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाचा आहे. एनसीबीने म्हटले आहे की, या प्रकरणात एजन्सी परदेशातून पैशांच्या व्यवहाराबाबत तपास करत आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे.


आर्यन खान तुरुंगात असल्यापासून गौरी- शाहरुखची झोप उडाली


आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर आर्यन खान तुरुंगात राहणार की त्याला जामीन दिला जाईल हे स्पष्ट होईल. आर्यन खानला आज किंवा उद्या जामीन मिळाला नाही तर त्याला संपूर्ण आठवडा तुरुंगात राहावे लागेल. कारण, न्यायालय 15 ते 19 तारखेपर्यंत बंद आहे.


आपल्यावर पाळत ठेवली जातेय, NCB Officer Sameer Wankhede यांची तक्रार, वानखेडेंकडून CCTV फुटेज जारी