Cruise Drugs Case : शाहरुख खान (Shahrukh Khan)आणि गौरी खानला (Gauri Khan)आर्यन खानच्या अटकेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्यनला एनसीबीने (NCB) क्रुझ ड्रग्ज प्रकरणी पकडले होते. त्यानंतर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याला पुन्हा अटकेत राहावे लागले होते. शाहरुख सध्या मुलाला सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसून येत आहे. 


 शाहरुखच्या जवळच्या मित्राने केला खुलासा


प्रकरण इतके दिवस चालेल याचा अंदाज नव्हता, असा खुलासा खान कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे. सतीश मानेशिंदे या वकिलांसोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी आर्यनला लवरकात लवकर सोडवू असा विश्वास दिला होता. पण तसे काहीच न झाल्याने आर्यनच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. 


अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे शाहरुख खान


सुत्रांच्या माहितीनुसार आर्यन खानसोबत शाहरुख आणि गौरीचा काहीही संपर्क होऊ शकत नाही आहे. पण शाहरुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आर्यनच्या तब्येतीची चौकशी करत करत असतो. या प्रकरणामुळे सिद्ध झाले आहे, वाईट गोष्टींचा अवलंब केलेल्या व्यक्तीला नेहमी शिक्षाचं भोगावी लागते. 


13 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी
शाहरुखला करण जोहर, सलमान खान येऊन भेटतात. आर्यन खानची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे. 


आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन फेटाळला


शुक्रवारी क्रुझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील फोर्ट कोर्टात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.


कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.