Krushna Abhishek : अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने (Krushna Abhishek) त्याची बहिण अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) हिच्या विवाहाबाबत माहिती दिली आहे. 'बिग बॉस 13'ची स्पर्धक आरती लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता एप्रिल किंवा मे महिन्यात ते विवाहबंधनात अडकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोघांच्या विवाहाच्या बातम्यांवर कृष्णा अभिषेकने शिक्कामोर्तब केलाय. 


विवाहाला गोविंदाची असणार उपस्थिती 


कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा (Govinda) यांच्या नात्याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्यांच्या नाते अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे आहे. मात्र, अनेकदा त्यांच्यामधील मतभेदही समोर आले आहेत. दरम्यान, कृष्णाने (Krushna Abhishek) आरतीच्या विवाहासंबंधी माहिती देताना मामा गोविंदाचा (Govinda) उल्लेख केलाय. कृष्णा म्हणाला, बॉलिवूड अभिनेता म्हणजेच त्याचा मामा गोविंदा आणि मामी सुनिताही या विवाहाला उपस्थित असतील. सर्वांत प्रथम त्यांना निमंत्रण दिले जाईल. 


लवकरच तारिख समजणार 


कृष्णाने आरतीच्या विवाहाचा खुलासा करताना म्हटले की, आरती तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे. अधिक माहिती देताना कृष्णा म्हणाला, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. यावेळी कृष्णा  विनोदाने म्हणाला की, आरती खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवेल. दरम्यान, गोविंदा त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहणार का? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  सोशल मीडियावर आरतीच्या विवाहाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. 


पहिले निमंत्रण गोविंदाला (Govinda and Abhishek)


कृष्णाने आरतीचा विवाहादिवशी संपूर्ण कटुंबाला एकत्रित आणण्याबाबत भाष्य केले. गोविंदा (Govinda) आरतीच्या विवाहाला उपस्थित राहिल का? असा सवाल कृष्णाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कृष्णा म्हणाला, "सर्वांत पहिले निमंत्रण गोविंदा यांना देण्यात येईल. ते माझे मामा आहेत. आमच्यामध्ये काही मतभेद झाले होते. तो वेगळा मुद्दा आहे. मात्र, विवाहाचे पहिले निमंत्रण मामालाच देण्यात येईल. ते विवाहाला नक्कीच उपस्थित राहतील." गेल्या वर्षी कृष्णाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मामासोबतचे मतभेद दूर करायचे आहेत, असे मत मांडले होते. शिवाय गोविंदा यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली आहे, असेही कृष्णा म्हणाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Anant-Radhika Wedding: अनंत अंबानी-राधिका मंर्चंटच्या लग्नात सुरांची मैफिल सजणार, बॉलिवूडचे 'हे' दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स