Arman Malik Payal Malik: यूट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकचा (Payal Malik)एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती बेबी बंपसह जिममध्ये वर्कआउट करताना दिसते. तिच्यासोबत अरमानही दिसतो आणि तो पायलच्या बेबी बंपची काळजी घेताना दिसतोय. पण पायल एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत जड वजनं उचलताना दिसतेय त्यामुळे अनेकांनी या व्हिडिओवर  प्रश्न उपस्थित केले आहेत प्रेग्नन्सीत इतका हेवी व्यायाम करणं खरंच गरजेचं आहे का? असं म्हणत काळजी व्यक्त केलीय.पायल मलिक सध्या तिची तिसरी प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहे. प्रेग्नन्सी असतानाही ती फिटनेसबद्दल खूप जागरूक दिसते. पायलनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती हेवी वर्कआउट करताना दिसते.

Continues below advertisement

वर्कआउटदरम्यान पायल खुश दिसली

या वेळी अरमान तिच्यासोबत होता आणि तिला सपोर्ट करताना दिसला. वर्कआउटदरम्यान पायल खूप खुश दिसत होती. अरमानने तिला दिलेल्या सपोर्टची अनेकांनी स्तुती केली. काही लोकांना तर कृतिका नसल्यामुळे अरमान-पायलची केमिस्ट्री आणखी छान वाटत असल्याचंही म्हणताना दिसलं. मात्र काहींना अजूनही प्रेग्नन्सीत हे सगळं करण्याची काय गरज? असा प्रश्न पडताना दिसतोय. अलीकडेच सोशल मीडियावर काहींनी दावा केला होता की पायलची ही प्रेग्नन्सी खोटी आहे. यावर पायलनं स्वतःचा व्लॉग टाकून त्यांना सुनावलं होतं. पायल म्हणाली होती,“जे लोक म्हणत आहेत की माझी प्रेग्नन्सी फेक आहे, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर पुढच्या 10 वर्षं मी त्यांची गुलामी करेन. माझ्या नावावर जे काही आहे ते सगळं त्यांच्या नावावर करेन.”

Continues below advertisement

यूट्यूबर अरमान मलिकनं दोन लग्नं केली आहेत आणि दोघींनाही घेऊन तो ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये दिसला होता. अरमाननं पहिलं लग्न 2011 मध्ये पायल मलिकसोबत केलं. अरमाननं सांगितलं होतं की पायलला भेटल्याच्या सातव्या दिवशीच तो तिच्यासोबत पळून गेला आणि लग्न केलं.यानंतर 2018 मध्ये, पायलला घटस्फोट न देता अरमाननं पायलचीच जिवलग मैत्रीण कृतिकाशी लग्न केलं. अरमानचं संपूर्ण कुटुंब एका घरात एकत्र राहतं.