Sachin Tendulkar family wedding celebrations highlights: तेंडुलकर यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरु आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अर्जून तेंडुलकर सानिया चंडोकसोबत विवाह करणार आहे. 3 मार्च रोजी दोघांचा हळदी समारंभ झाला. हळदी समारंभात अर्जून आणि सानिया ही जोडी सुरेख दिसत होती. हळदी समारंभासाठी खास चांडोक आणि तेंडुलकर कुटुंब एकत्र आले होते. यावेळी सारा तेंडुलकरचा लूक लक्षवेधी आणि खास ठरला. कलरफूल मिरर वर्क लेहेंग्यामध्ये सारा कमाल दिसत होती. या खास सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोन्ही कुटुंबाने एकत्र व्हिडिओ आणि फोटो शूट केले आहेत.
लेकाच्या हळदीच्या खास कार्यक्रमात सचिनने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. रिपोर्ट्सनुसार, या खास सोहळ्यात युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल देखील उपस्थित होती. सचिनने अर्जूनच्या लग्नासाठी खास दिग्गज नेते मंडळींना आमंत्रित केले आहे. सचिनने अर्जूनच्या लग्न सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते मंडळींना आमंत्रित केले आहे.
या समारंभात मुलगा अर्जूनविषयी सचिन म्हणाला, 'जेव्हा आपला मुलगा मुलीची ओळख करुन देण्यासाठी घरी आणतो. तेव्हा मुलगा मोठा झाला आहे, हे स्पष्ट होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. अर्जून मला तुझा खूप अभिमान आहे. तुला आयुष्यात इतकी खास व्यक्ती मिळाली आहे, जी तुला तितकंच प्रेम करते, जितकं तू तिच्यावर प्रेम करतो'. सध्या या सोहळ्यातील खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऑगस्ट 2025 रोजी अर्जून आणि सानियाचा साखरपुडा झाला. आता लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकतील.
अर्जुन तेंडुलकरला अलिकडेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे ट्रेड करण्यात आले आहे. तो सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळत आहे. तर, सानिया चांडोक ही एक यशस्वी उद्योजिका असून, ती एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. माहितीनुसार, ती मुंबईतील नामांतकित उद्योगपती रवि घई यांची नात आहे.