Arjun Kapoor, Anshula Kapoor, Khushi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) कोरोनाची लागण झाली होती. त्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती.  अर्जुनसोबतच त्याच्या बहिणीचा म्हणजेच अंशुला कपूरचा (Anshula Kapoor) देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मुंबई महापालिकेने अर्जुन कपूरच्या रहेजा ऑर्किड बिल्डिंगच्या बाहेर इमारत सील केल्याची माहिती देणारा फलकदेखील लावले होते. आता अर्जुन आणि त्याची बहिण अंशुला हे कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र आता कुशी कपूरला (Khushi Kapoor)) कोरोनाची लागण झाली आहे. 


रिपोर्टनुसार, अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.  जाह्नवी आणि बोनी कपूर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 






अंशुलाला तिच्या वाढदिवसलाच   कोरोनाची लागण झाली आहे. अंशुला आणि अर्जुनने आज सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. परंतु, तिने कोरोना झाल्याबद्दल काहीही पोस्ट केलेले  नव्हते.  तसेच खुशीने देखील सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. 


संबंधित बातम्या 


Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’


Vikram Vedha First Look : वाढदिवसानिमित्त हृतिककडून चाहत्यांना खास गिफ्ट, शेअर केला 'वेधा' चा फर्स्ट लूक