Arjit Singh: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो त्याच्या निवृत्तीच्या घोषणामुळे. चित्रपटामध्ये पार्श्वगायन करणार नसल्याचे सांगत त्याने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली. जी कामे त्याने आधीपासून घेतली होती ती तो पूर्ण करणार आहे. मात्र त्यानंतर कोणत्याही चित्रपटासाठी पार्श्वगायन करणार नसल्याचं त्याने म्हटलं होतं. अरिजीतच्या या निर्णयाने त्याचे चाहते शॉक झाले आहेत. मात्र, अर्जित सिंगने आता दमदार कमबॅक केलं असून तो पुन्हा एकदा स्टेज परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच कोलकात्यामध्ये त्याने सितार वादक अनुष्का शंकर (Anushka Shankar)यांच्यासोबत परफॉर्मन्स केला. 'चाप्टर्स टूर' या अनुष्का शंकर यांच्या कार्यक्रमात अरजीतने पाहुणा कलाकार म्हणून सहभाग घेतला होता. अरिजीतला स्टेजवर आमंत्रित करतानाच प्रेक्षकांनी तुफान टाळ्यांचा कडकडाट करत त्याचा स्वागत केलं. अनुष्का शंकर आणि अरिजीतची जोडी ऐकताना प्रेक्षक भावूक झाले होते. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत.

Continues below advertisement

'मी खूप नर्व्हस आहे'...

स्टेजवर येताच अरजीत प्रेक्षकांना पाहून हसला आणि म्हणाला ' मी खूप नर्व्हस आहे . मला आत घेतल्याबद्दल धन्यवाद ' यावेळी अरिजीत अनुष्का आणि विक्रम घोष यांनी एकत्र माया भोरा राती हे गाणं गायलं . हे एक बंगाली गाणं आहे. पंडित रविशंकर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केला आहे. या लाईव्ह शो मध्ये अरिजीत सिंह आणि अनुष्का शंकर यांनी 'ट्रेसेस ऑफ यु ' हे गाणंही सादर केलेलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तू फोन व्हायरल होतोय. अरिजीतला स्टेजवर जाताना पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड गहिवरून आलो होतं. अनेक चाहते इमोशनल झाले होते. या व्हिडिओच्या खाली ही अनेकांनी कमेंट करत 'किती वर्षांनी तुझा आवाज ऐकतोय असं वाटत 'असल्याचं म्हटलं.

 

Continues below advertisement

 

अरिजीतने यापुढे चित्रपटांसाठी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अरिजितने ही घोषणा केली. अरिजीत सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. आपण यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही असं अरिजितने सोशल मीडियावरुन जाहीर केलं. इतक्या वर्षात आपल्याला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे मात्र अरिजीतने स्पष्ट केलं नाही. अरिजीत 'स्वतंत्र संगीत' आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.