APJ Adbul Kalam Biopic:  माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. A. P. J. Abdul Kalam) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. अशातच आता सर्वांची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. साऊथ सुपरस्टार धनुषनं मिसाईल मॅन (Missile Man of India) आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची अनाउंसमेंट केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वतः धनुष डॉ. कलामांची भूमिका साकारणार आहे. कान्स 2025 फिल्म फेस्टिवलमध्ये या बायोपिकची अनाउंसमेंट करण्यात आली.  

कान्समध्ये बायोपिकची अनाउंसमेंट

साऊथ सुपरस्टार धनुष पडद्यावर झळकणार म्हणजे, काहीतरी धमाकेदार, दमदार पाहायला मिळणार हे 100 टक्के ठरलेलंच. अशातच आता धनुषनं त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. धनुष यावेळी देशाचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर मांडणार आहे. 

धनुषच्या आगामी सिनेमाचं नाव आहे, 'कलाम: मिसाइल मैन ऑफ इंडिया'. फिल्मचं पोस्टर रिलीज करत या आगामी बायोपिकची अनाउंसमेंट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आली. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

धनुषनं इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणाला? 

धनुषनं आगामी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आणि लिहिलंय की, "अशा प्रेरणादायी आणि उदार नेते, आपल्या सर्वांचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम सर यांचं जीवन साकारताना मला खरोखरच धन्य आणि नम्र वाटतंय." धनुषच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.  

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव 

धनुषनं इन्स्टा पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. एका युजरनं लिहिलंय की, नॅशनल अवॉर्ड कन्फर्म आहे, तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, प्राउड फैन थलाइवा. आणखी एका युजरनं कमेंट केलीय की, अनएक्सपेक्टिड अनाउंसमेंट. तसेच, काहींनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकानं लिहिलंय की, दिग्दर्शकाचं नाव दिसेपर्यंत सगळं ठिक होतं. 

दरम्यान, 'कलाम: द मिसाईल मॅन' हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित करणार आहेत. ओम राऊत यांनी यापूर्वी प्रभासचा 'आदिपुरुष' दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suniel Shetty Angry: 'सबको एक्सपोज कर दूंगा...', लेकाबाबत निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना सुनील शेट्टीनं फटकारलं, 'बॉर्डर 2'बाबत म्हणाला...